Join us  

ICC World Cup 2019 : पाकिस्तान उपांत्य फेरीच्या दिशेने; दिग्गज न्यूझीलंडवर विजय

आता पाकिस्तानने जर दोन सामने जिंकले तर ते उपांत्य फेरीत पोहोचू शकतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2019 11:46 PM

Open in App

लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : बाबर आझमचे शतक आणि शाहीन आफ्रिदीच्या भेदक माराच्या जोरावर पाकिस्तानने आपले आव्हान जीवंत ठेवले. न्यूझीलंडनेपाकिस्तानपुढे २३८ धावांचे आव्हान ठेवले होते. पाकिस्तानने बाबरचे शतक आणि हॅरिस सोहेलच्या अर्धशतकाच्या जोरावर हा सामना सहजपणे जिंकला.

 

न्यूझीलंडच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवात चांगली झाली नाही. पाकिस्तानची ११ षटकांत २ बाद ४४ अशी अवस्था होती. पण त्यानंतर बाबर फलंदाजीला आला आणि त्याने सामन्याचा नूर बदलला. या सामन्यात आशियातील सर्वात जलद तीन हजार धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत बाबरने अव्वल स्थान पटकावले. बाबरला यावेळी सोहेलने चांगली साथ दिली.

शाहिन आफ्रिदीच्या भेदक माऱ्यामुळे न्यूझीलंडची भंबेरी उडाल्याचे पाहायला मिळाले होते. कारण शाहिनच्या तीन विकेट्समुळे न्यूझीलंडची ५ बाद ८३ अशी दयनीय अवस्था झाली होती. पण त्यानंतर जेम्स नीशाम आणि कॉलिन डी ग्रँडहोम यांच्या दमदार फलंदाजीमुळे न्यूझीलंडला आव्हानात्मक धावसंख्या रचता आली.

न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. पण हा निर्णय त्यांच्याच अंगलट आल्याचे पाहायला मिळाले. कारण त्यांचा अर्धा संघ ८३ धावांमध्येच तंबूत परतला होता. त्यानंतर जेम्स नीशाम आणि कॉलिन डी ग्रँडहोम यांनी सहाव्या विकेटसाठी १८३ धावांची भागीदारी रचली आणि संघाला दोनशे धावांपर्यंत मजल मारून दिली. या सामन्यात शाहीनचा स्पेल न्यूझीलंडला चांगलाच महागात पडला. कारण शाहीनने कॉलिन मुन्रो, रॉस टेलर आणि टॉम लॅथम यांना स्वस्तात तंबूचा रस्ता दाखवला. फॉर्मात असलेल्या केन विल्यम्सनला शादाब खानने माघारी धाडले.

 न्यूझीलंड गेल्या सहा सामन्यात खेळवतोय एकच संघ, पाहा आकडेवारी...विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत न्यूझीलंडने बुधवारी पाकिस्तानविरुध्द उतरवलेला संघ हा त्यांचा सलग सहाव्या सामन्यातला तोच संघ होता. गेल्या सहा सामन्यात त्यांनी आपल्या प्लेर्इंग इलेव्हनमध्ये एकही बदल केलेला नाही. विश्वचषक स्पर्धेत दुसºयांदा आणि वन डे क्रिकेटच्या इतिहासात पाचव्यांदा असे घडले आहे. विश्वचषक स्पर्धेत याआधी १९९९ मध्ये दक्षिण आफ्रिकेने सलग सहा सामन्यांत आपल्या संघात कोणताही बदल केलेला नव्हता. याबाबतचा विश्वविक्रम पाकिस्तानच्या नावावर असून त्यांनी एप्रिल २००२ मध्ये सलग सात सामने त्याच ११ खेळाडूंसह खेळले होते.

संघ                           सामने              कालावधीपाकिस्तान                   ७          ८ एप्रिल ते २४ एप्रिल २००२भारत                          ६          ६ जून ते ३० जून २०१३दक्षिण आफ्रिका            ६          १९ मे ते १० जून १९९९दक्षिण आफ्रिका            ६          २५ जानेवारी ते १३ फेब्रुवारी २००४न्यूझीलंड                     ६           १ जून ते २^^६ जून २०१९

न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात खेळताना पाकिस्तानचा फलंदाज बाबर आझमने इतिहास रचला आहे. हा इतिहास रचताना बाबरने सचिन, विराट, धोनी यांनाही पिछाडीवर सोडले आहे. नेमका हा पराक्रम आहे तरी काय, जाणून घेऊ या...

एकदिवसीय क्रिकेटमध्ये आशिया खंडातील सर्वात जलद तीन हजार धावा करणारा बाबर हा पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. हा विक्रम रचताना बाबरने सचिन, कोहली आणि धोनी यांना मागे टाकले आहे. बाबरने ६८ डावांमध्ये तीन हजार धावांचा पल्ला गाठला आहे. या ६८ डावांमध्ये बाबरने ९ शतक आणि १४ अर्धशतके लगावली आहेत. सध्याच्या घडीला बाबर हा ५०च्या सरासरीने धावा करत आहे.

टॅग्स :वर्ल्ड कप 2019पाकिस्तानन्यूझीलंड