Join us  

ICC World Cup 2019 : हम डुबे थे सनम, तुम्हे भी ले गये; बांगलादेशनं पाकला स्पर्धेबाहेर केले

पाकिस्तान संघाला साखळी फेरीतील अखेरच्या लढतीत बांगलादेशविरुद्ध जेमतेम 9 बाद 315 धावा करता आल्या.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2019 8:17 PM

Open in App

 

लॉर्ड्स, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : पाकिस्तान संघाला साखळी फेरीतील अखेरच्या लढतीत बांगलादेशविरुद्ध जेमतेम 9 बाद 315 धावा करता आल्या. विशेष म्हणजे पाकिस्तानला 316 धावांच्या फरकानं विजय मिळवण्याची आवश्यकता होती आणि तेही त्यांना करता आले नाही. आता त्यांना बांगलादेशचा संपूर्ण संघ 7 धावांवर माघारी पाठवावा लागेल आणि तसे होणे अशक्य आहे. बांगलादेशने ८ वी धाव घेताच पाकिस्तानच्या मनसुब्यांना सुरुंग लावला. त्यामुळे उपांत्य फेरीत आता न्यूझीलंडचा मार्ग मोकळा झाला आहे. बांगलादेश आधीच स्पर्धेबाहेर फेकला गेला होता. फाखर  जमान ( 13) स्वस्तात माघारी परतल्यानंतर इमाम उल हक व बाबर आझम यांनी 157 धावांची भागीदारी करून पाकिस्तानला मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करून दिली. बाबरने अर्धशतकी खेळी करून नवा विक्रमाला गवसणी घातली. वर्ल्ड कप स्पर्धेच्या एका मोसमात सर्वाधिक धावा करणाऱ्या पाकिस्तानी फलंदाजाचा विक्रम त्याने नावावर केला. जावेद मियादाँद यांचा 1992च्या वर्ल्ड कपमधील 437 धावांचा विक्रम त्याने मोडला. मात्र, त्याला शतकानं हुलकावणी दिली. त्यानं 98 चेंडूंत 96 धावा केल्या. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये त्याने 474 धावा केल्या आहेत. इमामने शतकी खेळी केली. पण, पाकिस्तानच्या धावांचा वेग हा अपेक्षेपेक्षा कमी होता. मधल्या व तळाच्या फलंदाजांनी नांगी टाकल्यानं पाकिस्तानला 50 षटकांत 9 बाद 315 धावा करता आल्या.