Join us  

ICC World Cup 2019 : पाकिस्तानचा इंग्लंडला धक्का, विश्वचषकातील पहिला विजय

ज्या संघाने या विश्वचषकात निचांक धावसंख्या नोंदवली होती, त्याच पाकिस्तानने या विश्वचषकातील सर्वाधिक धावसंख्याही उभारली. तीन अर्धशतकांच्या जोरावर पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना ३४८ धावांचा डोंगर रचला.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2019 11:13 PM

Open in App

लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे, असे म्हटले जाते. या गोष्टीचा प्रत्यय पाकिस्तानने या विश्वचषकात आणून दिला. ज्या संघाने या विश्वचषकात निचांक धावसंख्या नोंदवली होती, त्याच पाकिस्तानने या विश्वचषकातील सर्वाधिक धावसंख्याही उभारली. तीन अर्धशतकांच्या जोरावर पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना ३४८ धावांचा डोंगर रचला. या आव्हानाचा पाठलाग इंग्लंडला यशस्वीपणे करता आला नाही आणि पाकिस्तानने 14 धावांनी अविश्वसनीय विजय मिळवला. पाकिस्तानचा हा या विश्वचषकातील पहिला विजय ठरला.

पाकिस्तानच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा कर्णधार जो रुट (१०७) आणि जोस बटलर  (१०३) यांनी शतके झळकावली. पण तरीही इंग्लंडला या सामन्यात विजय मिळवता आला नाही. त्यापूर्वी,  पहिल्या सामन्यात मानहानीकारक पराभव पत्करल्यानंतर दुसऱ्या सामन्यात मात्र पाकिस्तानने तिनशे धावांचा आकडा पार केल्याचे पाहायला मिळाले.

इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानच्या सलामीवीरांनी दमदार सुरुवात केली. त्यानंतर प्रत्येक घडीला पाकिस्तानचा एक तरी स्थिरस्थावर झालेला फलंदाज खेळपट्टीवर असल्याचे पाहायला मिळाले. पाकिस्तानच्या एकाही खेळाडूचे शतक झाले नसले तरी मात्र त्यांनी आव्हानात्मक धावसंख्या उभारली.

पाकिस्तानच्या सलामीवीरांनी चांगली सुरुवात केली तरी त्यांना अर्धशतक पूर्ण करता आले नाही. पण त्यानंतर बाबर आझम(63), मोहम्मद हाफिझ (84) आणि कर्णधार सर्फराझ अहमद (55) यांनी अर्धशतकी खेळी साकारत संघाची धावगती वाढवली.

पाकिस्तानने रचला नवा विक्रमपहिल्या सामन्यात तोंडगशी पडलेल्या पाकिस्तानने दुसऱ्या सामन्यात मात्र तिनशे धावांचा पल्ला गाठला. हा पल्ला गाठताना पाकिस्तानने एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.

या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना ३४९ धावा केल्या. पण या सामन्यात पाकिस्तानच्या एकाही फलंदाजाला शतक झळकावता आले नाही. एकाही खेळाडूने शतक न झळकावता पाकिस्तानने सर्वोच धावसंख्या रचण्याचा विक्रम विश्वचषकात प्रस्थापित केला आहे. कारण विश्वचषकात एकही शतक न झळकावता झालेली ही सर्वोच्च धावसंख्या आहे. यापूर्वी हा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या नावावर होता. दक्षिण आफ्रिकेने २०१५ साली झालेल्या विश्वचषकात युएई संघाविरुद्ध एकही शतक न झळकावता ३४१ धावा केल्या होत्या. दक्षिण आफ्रिकेनंतर हा विक्रम पाकिस्तानच्याच नावावर होता आणि तो या विश्वचषकातच झाला होता. पाकिस्तानने २०१५ साली झालेल्या विश्वचषकात युएई संघाविरुद्धच एकही शतक न झळकावता ३३९ धावा केल्या होत्या.

एकही शतक न झळकावता विश्वचषकात झालेल्या सर्वाधिक धावा348/8 पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड, नॉटिंगहॅम, २०१९341/6 दक्षिण आफ्रिका विरुद्ध युएई, वेलिंगटन, २०१५339/6 पाकिस्तान विरुद्ध युएई, नेपिअर, २०१५338/5 पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका, स्वेस्निया, १९८३

टॅग्स :पाकिस्तानवर्ल्ड कप 2019