Join us  

ICC World Cup 2019 : बॅटींग करत असताना धोनीनेच लावली बांगलादेशची फिल्डिंग

कदाचित तुम्हाला यावर विश्वास बसणार नाही. पण याबाबतचा व्हिडीओ पाहिल्यावर मात्र तुमचा विश्वास बसेल.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2019 4:28 PM

Open in App

कार्डिफ, आयसीसी वर्ल्डकप 2019 : भारताने दुसऱ्या सराव सामन्यात बांगलादेशवर विजय मिळवला. या सामन्यात महेंद्रसिंग धोनीने झंझावाती शतक लगावले आणि विजयात मोलाचा वाटा उचलला. पण या सामन्यात बॅटींग करत असताना धोनीनेच बांगलादेशची  फिल्डिंग लावल्याचे पाहायला मिळाले. कदाचित तुम्हाला यावर विश्वास बसणार नाही. पण याबाबतचा व्हिडीओ पाहिल्यावर मात्र तुमचा विश्वास बसेल.

नेमके घडले काय...भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये दुसरा सराव सामना खेळवण्यात आला. या सामन्यात धोनी शतक लगावले. ही शतकी खेळी साकारताना धोनीने बांगलादेशची फिल्डींग लावल्याचे पाहायला मिळाले. ही गोष्ट घडली ती शब्बीर रेहमानच्या 39व्या षटकात. या षटकात शब्बीर जेव्हा चेंडू टाकायला येत होता. तेव्हा धोनीने शब्बीरला थांबवले. त्यानंतर धोनीने मिड विकेटवर उभ्या असलेल्या बांगलादेशच्या खेळाडूला स्क्वेअर लेगला जायला सांगितले. शब्बीरनेही धोनीच्या म्हणण्यानुसार आपल्या खेळाडूची जागा बदल्याचे पाहायला मिळाले.

हा पाहा खास व्हिडीओ

लोकेश राहुल आणि महेंद्रसिंग धोनी यांच्या दमदार शतकाच्या जोरावर भारताने दुसऱ्या सराव सामन्यात तिनशे धावांचा आकडा पार केला. बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात भारताची आश्वासक सुरुवात झाली नसली तरी राहुल आणि धोनी यांच्या शतकाच्या जोरावर भारताने 359 धावांपर्यंत मजल मारली आहे. धोनीने 78 चेेंडूंत आठ चौकार आणि सात षटकारांच्या जोरावर 113 धावांची शतकी खेळी साकारली. राहुलने 99 चेंडूंत 12 चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर 108 धावांची खेळी केली.

बांगलादेशने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. या सामन्यातही सलामीवीर शिखर धवन आणि रोहित शर्मा आपली छाप पाडू शकले नाहीत. विराट कोहलीने 47 धावा केल्या, पण त्याला मोठी खेळी साकारता आली नाही. पण त्यानंतर राहुल आणि धोनी यांची चांगलीच जोडी जमली. या जोडीने पाचव्या विकेटसाठी 164 धावांची दमदार भागीदारी रचली. 

भारताला यावेळी चौथ्या क्रमांकाचे दडपण होते. पण राहुलने शतक झळकावत या स्थानाला न्याय दिल्याचे म्हटले जात आहे. राहुलने 99 चेंडूंत 12 चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर 108 धावांची खेळी साकारली. धोनीनेही राहुलला चांगली साथ दिली. राहुल बाद झाल्यावरही धोनीने जोरदार फटकेबाजी करत आपले शतक पूर्ण केले.

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीवर्ल्ड कप 2019