Join us  

ICC World Cup 2019 : जोफ्रा आर्चर ठरला 'ज्योतिषाचार्य'; चार वर्षांपूर्वीचं भाकित तंतोतंत खरं ठरलं!

ICC World Cup 2019 : इंग्लंडने वर्ल्ड कप जेतेपदाचा दुष्काळ अखेरीस संपवला. लॉर्ड्सवर रविवारी झालेल्या लढतीत त्यांनी न्यूझीलंडचा पराभव केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2019 11:22 AM

Open in App

लॉर्ड्स, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : इंग्लंडने वर्ल्ड कप जेतेपदाचा दुष्काळ अखेरीस संपवला. लॉर्ड्सवर रविवारी झालेल्या लढतीत त्यांनी न्यूझीलंडचा पराभव केला. निर्धारीत षटकानंतर सुपर ओव्हरमध्येही सामना बरोबरीत सुटल्यानं सर्वाधिक चौकारांच्या जोरावर इंग्लंडने बाजी मारली. इंग्लंडचा युवा गोलंदाज जोफ्रा आर्चरनं चार वर्षांपूर्वी या सामन्याचं भाकित केलं होतं आणि ते रविवारी तंतोतंत खरं ठरलं. त्यामुळे जोफ्राला ज्योतिषाचार्य म्हणून संबोधलं जात आहे.

सोशल मीडियावर आर्चरचे हे ट्विट सध्या व्हायरल होत आहेत..14 एप्रिल 2013 : 6 चेंडूंत 16 धावा  29 मे 2014 : लॉर्ड्सवर जायची इच्छा आहे5 जुलै 2015 : सुपर ओव्हरमध्येही काहीच अडचण येणार नाहीआर्चरच्या याच ट्विट्सने नेटिझन्सचे लक्ष वेधले आहे. सामना सुपर ओव्हरमध्ये गेल्यानंतर कर्णधार इयॉन मॉर्गनने चेंडू आर्चरच्या हाती दिला, आर्चरनेही 15 धावा देत सामना पुन्हा बरोबरीत सोडवला. 

यापूर्वी भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील उपांत्य फेरीच्या सामन्यातही आर्चरचे ट्विट्स व्हायरल झाले होते. त्यात त्यानं सातत्यानं पाऊस पडणार असल्याची भविष्यवाणी केली होती. आर्चरचा हा पहिलाच वर्ल्ड कप आहे. त्याने पदार्पणातच धुमाकूळ घातला आहे. सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये तो 20 विकेटसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.  

टॅग्स :वर्ल्ड कप 2019इंग्लंडन्यूझीलंड