Join us  

ICC World Cup 2019 : अबकी बार झाले 300 पार; राहुल आणि धोनी यांची शतके

धोनीने 78 चेेंडूंत आठ चौकार आणि सात षटकारांच्या जोरावर 113 धावांची शतकी खेळी साकारली.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2019 7:13 PM

Open in App

लंडन, आयसीसी वर्ल्डकप 2019 : लोकेश राहुल आणि महेंद्रसिंग धोनी यांच्या दमदार शतकाच्या जोरावर भारताने दुसऱ्या सराव सामन्यात तिनशे धावांचा आकडा पार केला. बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात भारताची आश्वासक सुरुवात झाली नसली तरी राहुल आणि धोनी यांच्या शतकाच्या जोरावर भारताने 359 धावांपर्यंत मजल मारली आहे. धोनीने 78 चेेंडूंत आठ चौकार आणि सात षटकारांच्या जोरावर 113 धावांची शतकी खेळी साकारली. राहुलने 99 चेंडूंत 12 चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर 108 धावांची खेळी केली.

बांगलादेशने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. या सामन्यातही सलामीवीर शिखर धवन आणि रोहित शर्मा आपली छाप पाडू शकले नाहीत. विराट कोहलीने 47 धावा केल्या, पण त्याला मोठी खेळी साकारता आली नाही. पण त्यानंतर राहुल आणि धोनी यांची चांगलीच जोडी जमली. या जोडीने पाचव्या विकेटसाठी 164 धावांची दमदार भागीदारी रचली. 

 

भारताला यावेळी चौथ्या क्रमांकाचे दडपण होते. पण राहुलने शतक झळकावत या स्थानाला न्याय दिल्याचे म्हटले जात आहे. राहुलने 99 चेंडूंत 12 चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर 108 धावांची खेळी साकारली. धोनीनेही राहुलला चांगली साथ दिली. राहुल बाद झाल्यावरही धोनीने जोरदार फटकेबाजी करत आपले शतक पूर्ण केले.

टॅग्स :वर्ल्ड कप 2019लोकेश राहुलमहेंद्रसिंग धोनी