Join us  

आयसीसी वर्ल्डकप 2019 : मैदानाबाहेरही ठरला हार्दिक पंड्या फेल, पाहा व्हिडीओ

आता पुन्हा एकदा हार्दिक कोणत्या गोष्टीमध्ये नापास झाला ते पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2019 8:45 PM

Open in App

लंडन, आयसीसी वर्ल्डकप 2019 : इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्डकपच्या सराव सामन्यात भारताच्या हार्दिक पंड्याला चमक दाखवता आली नाही. पण या सामन्यानंतर मैदानाबाहेरही तो एका गोष्टीमध्ये फेल झाल्याचे पाहायला मिळाले. आता पुन्हा एकदा हार्दिक कोणत्या गोष्टीमध्ये नापास झाला ते पाहा...

 हा पाहा व्हिडीओ

वर्ल्डकपमध्ये steady hand challenge घेतले जात आहे. हे चॅलेंज यापूर्वी रोहित शर्मानेही घेतले होते. त्यानंतर आता हार्दिकने हे चॅलेंज घेतले. या चॅलेंजमध्ये हार्दिक फेल झाल्याचे पाहायला मिळाला.

रोहित शर्माने स्वीकारले steady hand challengeवर्ल्डकपपूर्वी सरावामध्ये भारतीय संघ वेगवेगळे प्रयोग करताना दिसत आहे. सरावाच्या पहिल्याच दिवशी संघाने फुटबॉल खेळला. त्यानंतर संघाने  BIB snatching प्रॅक्टिस केली. त्यानंतर आता तर भारताचा हिटमॅन रोहित शर्माने steady hand challenge स्वीकारल्याचे पाहायला मिळाले. याबाबतचा एक व्हिडीओ बीसीसीआयने आपल्या ट्विटर हँडलवर पोस्ट केला आहे.steady hand challenge म्हणजे नेमके काय, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. आपले दोन्ही हात किती वेळ स्थिर राहू शकतात आणि ते एकाग्रतेने किती सावधपणे काम करू शकतात, असे steady hand challenge आहे.

भारतीय संघाने केली  BIB snatching प्रॅक्टिसभारतीय संघ वर्ल्डकप खेळण्यासाठी इंग्लंडमध्ये दाखल झाला आहे. भारतीय संघ कसून सरावही करत आहे. या सरावामध्ये भारतीय संघाने काही नवीन प्रयोगही केले आहेत. भारतीय संघाने पहिल्याच दिवशी एक प्रयोग केला आणि तो चांगलाच यशस्वी झाल्याचे पाहायाला मिळाले. भारतीय संघाने पहिल्याच सरावाच्या सत्रामध्ये BIB snatching प्रॅक्टिस केली. बीसीसीआयने या BIB snatching प्रॅक्टिसचा एक व्हिडीओ आपल्या ट्विटर हँडलवर पोस्ट केला आहे. पण BIB catching प्रॅक्टिस म्हणजे नेमकं काय, हा प्रश्न साऱ्यांनाच पडला असेल.

बरेच संघ आपल्या सराव सत्रामध्ये बरेच प्रयोग करत असतात. काही वर्षांपूर्वी भारतीय संघ खो-खो हा खेळ सराव म्हणून खेळायचे. खो-खोमध्ये सर्वाधिक चपळता लागते, असे म्हटले जाते. त्यानंतर भारतीय संघाने फुटबॉलचा सरावामध्ये समावेश केला. इंग्लंडमध्ये दाखल झालेल्या भारतीय संघानेही पहिल्या दिवशी फुटबॉलचा सराव केला. त्यानंतर भारतीय संघाने BIB snatching प्रॅक्टिस केली. या प्रक्टिसनंतर खेळाडूंमध्ये चांगलाच हशा पिकला होता. BIB catching प्रॅक्टिस म्हणजे नेमकं काय, हे भारतीय संघातील फिरकीपटू युजवेंद्र चहलने सांगितले.

टॅग्स :हार्दिक पांड्यावर्ल्ड कप 2019