Join us  

ICC World Cup 2019 : हार्दिक पांड्या, लोकेश राहुल यांचे वर्ल्ड कपसाठी वर्कआउट

ICC World Cup 2019 : वर्ल्ड कप स्पर्धेला अवघे दहा दिवस राहिले आहेत. भारतीय संघ 22 तारखेला वर्ल्ड कप स्पर्धेसाठी लंडनकडे रवाना होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2019 4:25 PM

Open in App

मुंबई , आयसीसी वर्ल्ड कप 2019 : वर्ल्ड कप स्पर्धेला अवघे दहा दिवस राहिले आहेत. भारतीय संघ 22 तारखेला वर्ल्ड कप स्पर्धेसाठी लंडनकडे रवाना होणार आहे. इंडियन प्रीमिअर लीगच्या थकवणाऱ्या वेळापत्रकानंतर भारताच्या वर्ल्ड कप संघातील बऱ्याच खेळाडूंनी सुट्टीवर जाणे पसंत केले. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानेही ( बीसीसीआय) खेळाडूंना कामाचा ताण घेऊ नका, असा सल्ला देताना सुट्टीवर जाण्यास सांगितले. त्यामुळे कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार रोहित शर्मासह भारतीय संघातील अनेक खेळाडू भटकंतीला गेले. पण, हार्दिक पांड्यालोकेश राहुल यांनी जिममध्ये तासंतास वर्कआउट करताना दिसले.

कॉफी विथ करण प्रकरणानंतर हार्दिक व लोकेश हे वर्ल्ड कप संघात खेळतील की नाही याबाबत साशंकता होती. मात्र, माफीनाम्यानंतर आणि बीसीसीआयने सुनावलेला दंड भरल्यानंतर त्यांनी राष्ट्रीय संघात कमबॅक केले. आयपीएलमध्येही या दोघांनी दमदार कामगिरी केली. त्यामुळे वर्ल्ड कप स्पर्धेत त्यांच्याकडूनच्या अपेक्षा वाढल्या आहेत. या अपेक्षांवर खरे उतरण्यासाठी दोघेही कसून सराव करत आहेत.

मुंबई इंडियन्सला आयपीएलचे चौथे जेतेपद पटकावून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलणाऱ्या हार्दिकचीही पहिलीच वर्ल्ड कप स्पर्धा आहे. आपीएलमध्ये त्याने 16 सामन्यांत 191.62 च्या स्ट्राईक रेटनं  402 धावा चोपल्या, तर 14 विकेट्सही घेतल्या. लोकेश राहुलनेही यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये दुसरे स्थान पटकावले. त्याने 14 सामन्यांत 593 धावा कुटल्या आणि त्यात एक शतक व 6 अर्धशतकांचा समावेश होता. त्याच्या या दमदार खेळीने भारतीय संघातील चौथ्या स्थानावर दावेदारी सांगितली आहे. भारतीय संघ - विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, महेंद्रसिंग धोनी, केदार जाधव, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, लोकेश राहुल, दिनेश कार्तिक, विजय शंकर, रवींद्र जडेजा.

( हिटमॅन रोहित शर्मा सुट्टीवर... पाहा कूल फोटो! )

( विराट आणि अनुष्का गोव्यामध्ये घेतायत सुट्टीचा आनंद, फोटो वायरल

टॅग्स :वर्ल्ड कप २०१९हार्दिक पांड्यालोकेश राहुल