- हर्षा भोगले लिहितात...
आज बर्मिंगहॅम निळ्या रंगात न्हालेले दिसणार आहे. तसे ते भगवे असायला हवे होते. महत्त्वाची बाब म्हणजे दडपण हे निळ्या जर्सीसह उतरणाऱ्या दुस-या संघावर राहील. एकवेळ अशी होती की, इंग्लंडचा उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित मानला जात होता, पण आता ते एकाएकी अडचणीत दिसत आहेत. भारत पात्र ठरणार असल्याचे जवळजवळ निश्चित भासत असून सर्वांची नजर दुसºया संघावर आहे, विशेषता आपल्या शेजारी राष्ट्रावर.
इंग्लंडचे शानदार यश हे एकाच प्रकारच्या खेळपट्ट्यांवर एकाच प्रकारे खेळून मिळालेले आहे. पण, स्पर्धेत आपल्याला खेळपट्ट्यांकडून वेगळे वर्तन अनुभवायला मिळाले. या खेळपट्ट्यांवर फटके खेळणे सोपे भासत नाही. त्यासाठी त्यांच्यासोबत जुळवून घ्यावे लागते. प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास आतापर्यंत त्यात त्यांना यश मिळालेले नाही. विशेषत: खेळपट्टीचे स्वरुप जर पाकिस्तानविरुद्धच्या लढतीप्रमाणे राहिले तर या लढतीत भारताचे पारडे वरचढ राहील, असे म्हणता येईल.
भारताला अद्याप ४-५-६ क्रमांकाची अडचण सोडविता आलेली नाही, विजय शंकर चौथ्या क्रमांकावर संघर्ष करीत आहे आणि भारताने या क्रमांकावर अन्य फलंदाजाला संधी देण्याचा प्रयत्न करायला हवा. पण मला विशेषता के.एल. राहुलकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. माझ्या मते या लढतीत भारताचे पारडे वरचढ राहील.