Join us  

ICC World Cup 2019 : फाळणीनंतर प्रथमच भारताला पाठिंबा दिला अन् कोहलीनं निराश केलं - अख्तर

इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात भारत 31 धावांनी पराभूत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2019 8:36 AM

Open in App

लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : भारतीय संघाचा इंग्लंडकडून झालेला पराभव हा कोणाच्या जिव्हारी लागला असेल तर तो पाकिस्तानच्या. उपांत्य फेरीतील मार्गात प्रमुख अडथळा बनलेला इंग्लंडचा संघ रविवारी पराभूत होणे हे पाकच्या फायद्याचे होते, पण तसे झाले नाही. 

इंग्लंडच्या 337 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघ 306 धावंपर्यंत मजल मारू शकला. कधी नव्हे ते पाकिस्तानी चाहते चक्क भारत जिंकावा म्हणून चिअर करत होते. पण, पराभवानंतर पाकिस्तानी चाहते भारतीय संघावर नाराज दिसले. पाकच्या माजी खेळाडूंनी भारतीय संघाच्या खिलाडूवृत्तीवर प्रश्न उपस्थित केले. त्यात आता रावळपिंडी एक्स्प्रेस शोएब अख्तरची भर पडली आहे.

जेसन रॉय आणि जॉनी बेअरस्टो यांनी 160 धावांची विक्रमी भागीदारी करून इंग्लंडला धमाकेदार सुरुवात करून दिली होती. त्यांना जो रूट ( 44) आणि बेन स्टोक्स (79) यांनी धावांचा पाऊस पाडताना इंग्लंडला 337 धावांपर्यंत मजल मारून दिली. रोहित शर्मा ( 102), विराट कोहली ( 66) , हार्दिक पांड्या ( 45), महेंद्रसिंग धोनी ( 42) आणि रिषभ पंत ( 32) यांची खेळी व्यर्थ ठरली. 

या सामन्यानंतर अख्तर म्हणाला," आमच्या प्रार्थना भारतीय संघापर्यंत पोहोचल्या नाहीत. भारत-पाकिस्तान फाळणीनंतर प्रथमच आम्ही भारताला पाठिंबा दिला. भारतीय संघाने त्यांच्याकडून सर्वतोपरी प्रयत्न केले, याची खात्री आहे. पण, त्यांचे हे प्रयत्न पाकिस्तानच्या कामी आले नाही."  

टॅग्स :वर्ल्ड कप 2019भारत विरुद्ध इंग्लंडशोएब अख्तरविराट कोहलीपाकिस्तान