लंडन, आयसीसी वर्ल्डकप 2019 : यजमान इंग्लंडच्या संघाला वर्ल्डकप सुरु होण्यापूर्वीच मोठा धक्का बसला आहे. कारण त्यांचा कर्णधार इऑन मॉर्गन सराव करताना दुखापतग्रस्त झाला आहे. मॉर्गनवर उपचार करण्यात आले आहेत, त्याचबरोबर त्याची वैद्यकीय चाचणीही करण्यात आली आहे. पण अजूनपर्यंत या वैद्यकीय चाचणीचा अहवाल आलेला नाही. त्यामुळे मॉर्गन वर्ल्डकपमध्ये खेळणार की नाही, याबद्दल साशंकता व्यक्त करण्यात येत आहे.