Join us  

ICC World Cup 2019 : भारताच्या वर्ल्ड कप संघाची घोषणा कधी व कोठे, जाणून घ्या सर्व माहिती

ICC World Cup 2019: इंग्लंड आणि वेल्स येथे होणाऱ्या वर्ल्ड कप संघांत भारतीय संघाची जबाबदारी कोणत्या 15 खेळाडूंच्या खांद्यावर असेल, याची उत्सुकता गेल्या महिन्याभरापासून लागली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2019 11:34 AM

Open in App

मुंबई, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : इंग्लंड आणि वेल्स येथे होणाऱ्या वर्ल्ड कप संघांत भारतीय संघाची जबाबदारी कोणत्या 15 खेळाडूंच्या खांद्यावर असेल, याची उत्सुकता गेल्या महिन्याभरापासून लागली आहे. आज ती अखेर संपणार आहे. वर्ल्ड कप संघासाठीचा भारतीय संघ आज जाहीर होणार आहे. निवड समिती प्रमुख एमएसके प्रसाद यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत पार पडणाऱ्या बैठकीत ही घोषणा करण्यात येणार आहे. 30 मे ते 14 जुलै या कालावधीत ही वर्ल्ड कप स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. भारतीय संघातील सर्वच खेळाडू सध्या इंडियन प्रीमिअर लीगमध्ये खेळत आहेत.  

भारतीय संघाची घोषणा कधी ?2019च्या वर्ल्ड कप स्पर्धेसाठीचा भारतीय संघ सोमवारी जाहीर करण्यात येणार आहे. वर्ल्ड कप स्पर्धेसाठी संघ जाहीर करण्यासाठी 23 एप्रिल ही अंतिम मुदत आहे. त्यामुळे ही मुदत संपण्याच्या आठ दिवस आधीच संघ जाहीर करण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. 

संघ जाहीर करण्याची वेळआज दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास भारतीय संघाची घोषणा होऊ शकते

कोण करणार घोषणा?बीसीसीआयचे सचिव अमिताभ चौधरी आणि निवड समिती प्रमुख एमएसके प्रसाद हा संघ जाहीर करतील.  

संभाव्य अंतिम संघ

शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी, केदार जाधव, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह

वरील अकरा खेळाडू हे वर्ल्ड कपमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारच आहेत. फक्त चौथ्या क्रमांकासाठी महेंद्रसिंग धोनीला खेळवायचे की कॅप्टन कोहलीला एक स्थान खाली आणायचे, हा प्रश्न कायम राहतो. त्याशिवाय कुलदीप व युजवेंद्र या दोन फिरकीपटूंपैकी एकालाच संधी देऊन एक अतिरिक्त अष्टपैलू किंवा फलंदाज खेळवण्याचा विचार कोहली नक्की करेल.

कोणत्या स्थानासाठी चुरस? चौथ्या क्रमांकासाठी फलंदाज, राखीव सलामीवीर, राखीव यष्टिरक्षक आणि फिरकीपटू की चौथा जलदगती गोलंदाज, या स्थानांसाठी चुरस होणार आहे.   

उमेदवार कोण?

  • चौथ्या स्थानासाठी अंबाती रायुडू, रिषभ पंत, विजय शंकर आणि लोकेश राहुल यांचा पर्याय उपलब्ध आहे. 
  • राखीव यष्टिरक्षकः रिषभ पंत किंवा दिनेश कार्तिक
  • तिसरा फिरकीपटूः रवींद्र जडेजा 
  • चौथा जलदगती गोलंदाजः उमेश यादव, खलील अहमद, सिद्धार्थ कौल
  • अन्य पर्यायः नवदीप सैनी, शुबमन गिल, श्रेयस अय्यर, पृथ्वी शॉ
टॅग्स :वर्ल्ड कप २०१९बीसीसीआयमहेंद्रसिंग धोनीविराट कोहली