Join us  

ICC World Cup 2019: ख्रिस गेलला ढापला, सोशल मीडियावर जोरदार चर्चा

वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेलला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात पंचांनी ढापले, असे सोशल मीडियावर म्हटले जात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2019 8:56 PM

Open in App

लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेलला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात पंचांनी ढापले, असे सोशल मीडियावर म्हटले जात आहे. या गोष्टीची जोरदार चर्चा सोशल मीडियावर होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

पंचांच्या विरोधात गेलने दोनदा रीव्ह्यू घेतला आणि तो यशस्वी ठरला होता. पण जेव्हा गेलने तिसऱ्यांदा रीव्ह्यू घेतला तेव्हा तो बाद झाला. पण जेव्हा गेलला तिसऱ्या पंचांनी बाद दिले. त्यापूर्वी नेमके काय घडले होते, हे तपासून पाहायला हवे.

मिचेल स्टार्कच्या पाचव्या षटकात पंचांनी गेलला बाद दिले. त्यावेळी गेलने रीव्ह्यू मागितला. हा चेंडू अर्धवट स्टम्पला लागत असल्याने तिसऱ्या पंचांनी गेलला बाद दिले. पण गेल ज्या चेंडूवर बाद झाला तो फ्री-हिट असायला हवा होता. कारण गेल बाद होण्यापूर्वीचा चेंडू हा नो बॉल होता. पण पंचांनी तो दिला नाही. पंचांनी जर तो नो बॉल दिला असता, तर गेल ज्या चेंडूवर आऊट झाला तो फ्री हिट ठरला असता.

ख्रिल गेलने एकाच षटकात घेतले दोन रीव्ह्यू अन् तिसऱ्या वेळी घडला घातप्रत्येक संघाला एका डावात दोनदा रीव्ह्यू  घेता येतो. पण वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेलने एकाच षटकात दोन रीव्ह्यू घेतल्याचे पाहायला मिळाले. हेच तर काहीच नाही, त्याने तिसरा रीव्ह्यू देखील घेतला आणि तिथेच त्याचा घात झाला.

ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कच्या तिसऱ्या षटकात ही गोष्ट घडली. या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर गेलला पंचांनी झेल बाद दिले. गेलचा झेल यष्टीरक्षकाने पकडला, असा निर्णय पंचांनी दिला. त्यावेळी गेलने रीव्ह्यू घेतला आणि त्यामध्ये तो बाद ठरला.

तिसऱ्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर गेलला पंचांनी पायचीत बाद दिले. त्यावेळीही गेलने रीव्ह्यू घेतला. त्यावेळी तिसऱ्या पंचांनी गेल नाबाद असल्याचे ठरवले आणि तो दुसऱ्यांदा यशस्वी ठरला. पण तिसऱ्यांदा मात्र त्याचा घात झाला. पाचव्या षटकामध्ये पुन्हा एकदा स्टार्कच्या गोलंदाजीवर पंचांनी गेलला बाद दिले. गेल पायचीत असल्याचा निर्णय पंचांनी दिला. गेलने पुन्हा एकदा रीव्ह्यू घेतला. त्यावेळी चेंडू हा स्टम्पला अर्धवट लागत असल्याचे दिसत होते. जर पंचांनी नाबाद दिले असते आणि ऑस्ट्रेलियाने रीव्ह्यू घेतला असता तर गेल खेळत राहिला असता. पण पंचांनी आऊट दिल्यामुळे गेलला रीव्ह्यूचा फायदा होऊ शकला नाही आणि तो माघारी परतला.

टॅग्स :ख्रिस गेलवेस्ट इंडिजवर्ल्ड कप 2019