आयसीसी वर्ल्डकप 2019 : भारतीय संघाने केली  BIB snatching प्रॅक्टिस, पाहा व्हिडीओ

बीसीसीआयने या BIB snatching प्रॅक्टिसचा एक व्हिडीओ आपल्या ट्विटर हँडलवर पोस्ट केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2019 01:37 PM2019-05-24T13:37:56+5:302019-05-24T13:38:31+5:30

whatsapp join usJoin us
ICC World Cup 2019: BIB snatching practice by Indian team, watch video | आयसीसी वर्ल्डकप 2019 : भारतीय संघाने केली  BIB snatching प्रॅक्टिस, पाहा व्हिडीओ

आयसीसी वर्ल्डकप 2019 : भारतीय संघाने केली  BIB snatching प्रॅक्टिस, पाहा व्हिडीओ

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

लंडन, आयसीसी वर्ल्डकप 2019 : भारतीय संघ वर्ल्डकप खेळण्यासाठी इंग्लंडमध्ये दाखल झाला आहे. भारतीय संघ कसून सरावही करत आहे. या सरावामध्ये भारतीय संघाने काही नवीन प्रयोगही केले आहेत. भारतीय संघाने पहिल्याच दिवशी एक प्रयोग केला आणि तो चांगलाच यशस्वी झाल्याचे पाहायाला मिळाले. भारतीय संघाने पहिल्याच सरावाच्या सत्रामध्ये BIB snatching प्रॅक्टिस केली. बीसीसीआयने या BIB snatching प्रॅक्टिसचा एक व्हिडीओ आपल्या ट्विटर हँडलवर पोस्ट केला आहे. पण BIB catching प्रॅक्टिस म्हणजे नेमकं काय, हा प्रश्न साऱ्यांनाच पडला असेल.

बरेच संघ आपल्या सराव सत्रामध्ये बरेच प्रयोग करत असतात. काही वर्षांपूर्वी भारतीय संघ खो-खो हा खेळ सराव म्हणून खेळायचे. खो-खोमध्ये सर्वाधिक चपळता लागते, असे म्हटले जाते. त्यानंतर भारतीय संघाने फुटबॉलचा सरावामध्ये समावेश केला. इंग्लंडमध्ये दाखल झालेल्या भारतीय संघानेही पहिल्या दिवशी फुटबॉलचा सराव केला. त्यानंतर भारतीय संघाने BIB snatching प्रॅक्टिस केली. या प्रक्टिसनंतर खेळाडूंमध्ये चांगलाच हशा पिकला होता. BIB catching प्रॅक्टिस म्हणजे नेमकं काय, हे भारतीय संघातील फिरकीपटू युजवेंद्र चहलने सांगितले.

BIB snatching प्रॅक्टिसमध्ये प्रत्येक खेळाडूकडे एक BIB म्हणजेच एक कापडाचा तुकडा दिला जातो. हा तुकडा त्याने लपवायचा असतो. हे लपवलेले कापडाचे तुकडे जो जास्त जमा करेल, तो यामध्ये विजयी ठरतो.

हा पाहा खास व्हिडीओ


वर्ल्डकपपूर्वीच कोहली झाला 'या' गोलंदाजाचा फॅन
सध्याच्या घडीला भारताचा कर्णधार विराट कोहली हा एका गोलंदाजाचा चक्क फॅन झाला आहे. हा गोलंदाज भारतीय संघातील नसला तरी कोहलीला त्या गोलंदाजाने भूरळ पाडली आहे.

वर्ल्डकपपूर्वी आयपीएल खेळवण्यात आली. आयपीएलमध्ये या गोलंदाजाने आपली चमक दाखवली होती. त्याबरोबर आपल्या राष्ट्रीय संघाकडून खेळतानाही या गोलंदाजाने दमदार कामगिरी केली आहे. त्यामुळे क्रिकेट जगतामध्ये या गोलंदाजाचा चांगलाच दबदबा आहे. हा गोलंदाज आहे अफगाणिस्तानचा फिरकीपटू रशिद खान.

रशिदबद्दल विराट म्हणाला की, " गेल्या तीन वर्षांमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर मी रशिदविरुद्ध खेळलेलो नाही. मला रशिदविरुद्ध खेळायचे आहे. तो एक चांगला गोलंदाज आहे. जोपर्यंत फलंदाज कसा चेंडू खेळायचा विचार करतो, तोपर्यंत बॉल बॅटवर आलेला असतो. त्यामुळे रशिदच्या गोलंदाजीचा सामना करणे सोपे नाही. त्यामुळे मला त्याची गोलंदाजी आवडते आणि त्यामुळेच मला त्याच्या गोलंदाजीविरुद्ध खेळायचे आहे."

Web Title: ICC World Cup 2019: BIB snatching practice by Indian team, watch video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.