Join us  

ICC World Cup 2019 : फिंचने श्रीलंकेला झोडपले; ऑस्ट्रेलियाच्या ३३४ धावांचा डोंगर

फिंचच्या दिडशतकी खेळीच्या जोरावरच ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजी करताना ३३४ धावांचा डोंगर उभारता आला.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2019 6:59 PM

Open in App

लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : विश्वचषकातील काही सामन्यांमध्ये पावसाने झोडपल्याचे पाहायला मिळाले. पण ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिंचने आज श्रीलंकेच्या गोलंदाजीला झोडपल्याचे पाहायला मिळाले. फिंचच्या दिडशतकी खेळीच्या जोरावरच ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजी करताना ३३४ धावांचा डोंगर उभारता आला.

श्रीलंकेने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. पण फिंचने श्रीलंकेचा हा निर्णय चुकीचा असल्याचे दाखवून दिले. डेव्हिड वॉर्नरच्या साथीने खेळताना फिंचने श्रीलंकेच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. फिंच आणि वॉर्नर (२६) या जोडीने ८० धावांची सलामी दिली. वॉर्नर बाद झाल्यावर उस्मान ख्वाजाला (१०) मोठी खेळी साकारता आली नाही. पण त्यानंतर फलंदाजीला आलेल्या स्टीव्हन स्मिथबरोबर (७३) फिंचची जोडी चांगलीच जमली.

फिंच आणि स्मिथ या जोडीने श्रीलंकेच्या गोलंदाजांचा खरपूर समाचार घेत चौथ्या विकेटसाठी १७४ धावांची भागीदारी रचली. फिंचने ४२.४ षटके खेळपट्टीवर होता आणि या दरम्यान त्याने धडाकेबाज फलंदाजीचा नमुना पेश केला. फिंचने १३२ चेंडूंत १५ चौकार आणि पाच षटकारांच्या जोरावर १५३ धावांची दणदणीत खेळी साकारली. फिंचच्या या दीडशतकी खेळीच्या जोरावरच ऑस्ट्रेलियाला तिनशे धावांचा पल्ला सहज गाठता आला.

टॅग्स :अ‍ॅरॉन फिंचस्टीव्हन स्मिथवर्ल्ड कप 2019