Join us  

ICC World Cup 2019: कपिलदेव, इम्रान खान आणि जॅक कॅलिस यांना जे नाही जमले ते शकीबने करून दाखवले

जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या बांगलादेशच्या शकीब अल हसनने एक मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2019 12:00 AM

Open in App

साऊथम्टन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 :  जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या शकीब अल हसनची अष्टपैलू कामगिरी बांगलादेशने आज अफगाणिस्तानवर मिळवलेल्या विजयात निर्णायक ठरली. सुरुवातीला 51 धावांची अर्धशतकी खेळी करणाऱ्या शकीबने नंतर गोलंदाजीमध्ये कमाल करताना पाच बळी टिपले. विश्वचषकातील एकाच सामन्यात अर्धशतक आणि पाच बळी अशी दुहेरी कामगिरी करणारा शकीब हा युवराज सिंहनंतरचा दुसरा खेळाडू ठरला. या विक्रमाबरोबरच शकीबने अजून एक मोठा विक्रम आपल्या नावे केला. विश्वचषक स्पर्धेत 400 हून अधिक धावा आणि दहा बळी अशी कामगिरी करणार शकीब हा आतापर्यंतच्या इतिहासातील पहिलाच खेळाडू ठरला आहे. 

जागतिक क्रिकेटमधील अष्टपैलू क्रिकेटपटूंच्या यादीत दीर्घकाळापासून अव्वलस्थानी असलेला शकीब अल हसन यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. या स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस येण्याचा निर्णय शकीबला चांगलाच फळला आहे. आतापर्यंत खेळलेल्या सहा सामन्यांमध्ये मिळून 476 धावांसह शकीब सर्वाधिक धावा फटकावणाऱ्या खेळाडूंच्या यादीत अव्वलस्थानी आहे. त्याबरोबरच शकीबने गोलंदाजीतही दमदार कामगिरी करताना 10 बळी मिळवले आहेत. कुठल्याही क्रिकेटपटूने विश्वचषक स्पर्धेत अशी कामगिरी कुठल्याही क्रिकेपटूने प्रथमच केली आहेत. बांगलादेशचे विश्वचषक स्पर्धेच्या साखळी फेरीतील अजून दोन सामने शिल्लक असून, स्पर्धेत पाचशे धावा पूर्ण करतानाचा सर्वाधिक धावा फटकावणाऱ्या खेळाडूंच्या यादीतील अव्वलस्थान कायम राखण्याची संधी शकीब अल हसनकडे आहे. 

शकीबने आपल्या नावे केलेले विक्रम - विश्वचषक स्पर्धेत 400 हून अधिक धावा आणि 10 बळी घेणार पहिला फलंदाज -  एका सामन्यात 50 धावा आणि पाच बळी घेणार दुसरा खेळाडू - 29 धावांत पाच बळी, विश्वचषकात बांगलादेशसाठी एका डावात सर्वोत्तम गोलंदाजी - विश्वचषकात बांगलादेशकडून सर्वाधिक बळी घेणारा गोलंजाज- विश्वचषकात बांगलादेशसाठी सर्वाधिक धावा - 2019 च्या विश्वचषकात सर्वाधिक धावा फटकावणारा फलंदाज 

 

टॅग्स :वर्ल्ड कप 2019बांगलादेश