ICC Womens World Cup 2025 South Africa Women won by 3 wkts India Women : विशाखापट्टणमच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात भारतीय संघावर पराभवाची वेळ आलीय. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने ३ विकेट्सनी सामना जिंकत टीम इंडियाची विजयी हॅटट्रिक रोखली आहे. या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना आघाडीच्या फळीतील बॅटर्सच्या फ्लॉप शोमुळं टीम इंडिया अडचणीत सापडली होती. आठव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या रिचानं ९४ धावांची खेळी करत संघाचा वाचवलं. तिच्या या खेळीमुळे टीम इंडियानं दक्षिण आफ्रिकेसमोर २५२ धावांचे टार्गेट सेट केले. ज्या आठ क्रमांकानं वाचवल तोच डाव फिरला अन् दक्षि आफ्रिकेनं सामना जिंकला, असे काहीचे चित्र या सामन्यात पाहायला मिळाले. कारण दक्षिण आफ्रिकेच्या संघानेही आठव्या क्रमांकावर बॅटिंग करणाऱ्या बॅटरच्या जोरावर हा सामना आपल्या खिशात घातला. रिचा घोषच्या ९४ धावांच्या खेळीवर नेडीन डि क्लर्कची ८४ धावांची खेळी भारी पडली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
फलंदाजी वेळी आठव्या क्रमांकावर विक्रमी फलंदाजी करताना रिचानं वाचवलं; पण...
दक्षिण आफ्रिकेच्या संघानं टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाने सुरुवात चांगली केली. पण अर्धशतकी खेळीनंतर सलामी जोडी फुटली. स्मृती मानधना ३२ चेंडूत २३ धावा करून स्वस्तात माघारी फिरली. हरमनप्रीत, हरलीन देओल आणि जेमिमासह दीप्ती स्वस्तात माघारी फिरल्यामुळे टीम इंडिया अडचणीत सापडली. ६ बाद १०२ धावा अशी धावसंख्या असताना आठव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या रिजा घोषनं ७७ चेंडूत ९४ धावांची खेळी केली. तिला स्नेह राणानं ३३ धावांसह उत्तम साथ दिली. त्यामुळे भारतीय संघाने आठव्या क्रमांकावरील बॅटरच्या दमदार खेळीच्या जोरावर २५१ धावा करत दक्षिण आफ्रिकेसमोर २५२ धावांचे आव्हान ठेवले होते. पण कमालीचा योगायोग जुळून आला अन् आठव्या क्रमांकाचा जाव टीम इंडियावर उलटा फिरला. हा की, योगायोगानं हाच डाव उलटा फिरला.
दक्षिण आफ्रिकेच्या संघाकडून आठव्या क्रमांकाच्या बॅटरनंच फिरवला सामना
धावांचा बचाव करताना भारतीय महिला संघाने दमदार सुरुवात केली. क्रांती गौड हिने गत सामन्यातील सेंच्युरीयन वुमन तांझिन ब्रिट्स हिला खातेही उघडू न देता माघारी धाडले. ठराविक अंतराने भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला धक्क्यावर धक्के देत ८१ धावांवर अर्धा संध पॅव्हेलियनमध्ये धाडला. एका बाजूनं विकेट पडत असताना कर्णधार आणि सलामीची बॅटर लॉरा वॉल्व्हार्ड हिने ७० धावांची खेळी साकारली. दक्षिण आफ्रिकेच्या धावफलकावर १४२ धावा असताना क्रांतीनं तिला चालते केले. स्नेह राणा हिनं क्लोई ट्रायॉनला ४९ (६६) अर्धशतकाच्या उंबरठ्यावर बाद केले. पण दक्षिण आफ्रिकेकडून आठव्या क्रमांकावर फलंदाजी करणारी नेडीन डि क्लर्क टीम इंडियाच्या विजयातील अडथळा ठरली. ५४ चेंडूत ८ चौकार आणि ५ षटकार खेचत ८४ धावांची नाबाद खेळी करत तिने संघाला ३ विकेट्स आणि ७ चेंडू राखून विजय मिळवून दिला. या सामन्यात आठव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या दोघींनी कमालीची कामगिरी केली अन् शेवटी टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिकेच्या संघाने बाजी मारली.