ICC Womens World Cup 2025, New Zealand Women vs South Africa Women, 7th Match : न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका या दोन संघात महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील सातवा सामना खेळवण्यात येत आहे. या सान्यात न्यूझीलंडची कर्णधार सोफी डिव्हाइन हिने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण तिचा हा निर्णय पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूवरच फसवा निघाला. दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातून पहिलं षटक घेऊन आलेल्या मेरिझॅन कॅपनं पहिल्याच चेंडूवर न्यूझीलंडची सलामीची स्टार बॅटर सुझी बेट्सला पायचित करत पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पाकच्या ताफ्यातील महिला क्रिकेटरनंतर अशी कामगिरी करणारी मेरिझॅन दुसरी
ही विकेट घेत मेरिझॅन खास गोलंदाजाच्या क्लबमध्ये सामील झाली आहे. दुसरीकडे न्यूझीलंड महिला सघाच्या नावे लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली आहे. महिला वनडे वर्ल्ड कपच्या आतापर्यंतच्या इतिहासातील दुसरा संघ ठरलाय ज्यांनी पहिल्या चेंडूवर विकेट गमावली आहे. याआधी २०२२ मध्ये पाकिस्तानच्या नाहिदा खान हिने कॅथरीन सिल्व्हर ब्रंट हिला पहिल्या चेंडूवर बाद केले होते.
हरमनप्रीत कौरचे तेवर! नजरेने धाक दाखवणारी पाकिस्तानी खेळाडू खाली मान घालून पळाली (VIDEO)
सुझी बेट्सच्या पदरी सलग दुसरा भोपळा
न्यूझीलंडची स्टार बॅटर सुझी बेट्स यंदाच्या हंगामात सुरुवातीपासूनच संघर्ष करताना दिसत आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात गोल्डन डकची नामुष्की ओढावलेल्या सुझीला ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या सामन्यातही खाते उघडता आले नव्हते. महिला वनडे वर्ल्ड स्पर्धेच्या यंदाच्या हंगामात ती सलग दुसऱ्यांदा शून्यावर पॅव्हेलिनमध्ये परतल्याचे पाहायला मिळाले.
वनडेत तगडा रेकॉर्ड, पण सध्या बॅट चालेना!
सुझी बेट्स ही वनडे क्रिकेटमधील सर्वोत्तम बॅटरपैकी एक आहे. १७२ सामन्यातील १६५ डावात तिने ३९.५७ च्या सरासरीसह ५८९६ धावा केल्या आहेत. महिला वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या बॅटरच्या यादीत ती तिसऱ्या स्थानावर आहे. पण मागील ९ डावात ती सहा वेळा दुहेरी आकडा गाठण्यात अपयशी ठरलीये. उर्वरित ३ डावात तिने फिफ्टी प्लसचा डाव साधला आहे. आधीच न्यूझीलंडच्या संघाने पराभवाची सुरुवात केलीये. त्यात सुझीच्या फॉर्ममुळे संघाला आणखी अडचणीत आणले आहे.
Web Title : महिला विश्व कप में न्यूजीलैंड की बेट्स का ऐतिहासिक निम्न प्रदर्शन।
Web Summary : सुजी बेट्स का खराब प्रदर्शन जारी है, विश्व कप में गोल्डन डक का सामना करना पड़ा। न्यूजीलैंड ने पाकिस्तान के पहले बर्खास्तगी को दोहराते हुए एक अवांछित रिकॉर्ड बनाया। बेट्स, अपने मजबूत वनडे रिकॉर्ड के बावजूद, संघर्ष कर रही हैं, जिससे न्यूजीलैंड के अभियान पर दबाव बढ़ रहा है।
Web Title : New Zealand's Bates faces historic low in Women's World Cup.
Web Summary : Suzie Bates faced a golden duck, continuing her poor form in the World Cup. New Zealand recorded an unwanted record, mirroring Pakistan's earlier dismissal. Bates, despite her strong ODI record, struggles, adding pressure to New Zealand's campaign after a shaky start.
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.