Join us  

आज होता भारत-पाकिस्तान यांच्यात क्रिकेट सामना; जाणून घ्या काय निकाल लागला

आयसीसी महिला ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेला 21 फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या या स्पर्धेचा उद्धाटनीय सामना भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया असा होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2020 2:53 PM

Open in App

आयसीसी महिला ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेला 21 फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या या स्पर्धेचा उद्धाटनीय सामना भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया असा होणार आहे. तत्पूर्वी सर्व संघांच्या पूर्वतयारीसाठी सराव सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. सराव सामन्यांच्या वेळापत्रकानुसार आज भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात सामना होणार होता. पण, तो सामना रद्द करावा लागला. ब्रिसबन येथे खेळवण्यात येणारा हा सामना टॉस होण्यापूर्वीच रद्द करावा लागला. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांच्या वर्ल्ड कप तयारीसाठी हा सामना महत्त्वाचा होता, पण तो रद्द झाल्यानं दोन्ही संघांना मोठा झटका बसला आहे.

भारतीय महिला संघ आणि पाकिस्तान महिला संघ यांच्यात सकाळी 9 वाजल्यापासून हा सराव सामना सुरू होणार होता. पण, पावसामुळे मैदान ओलं झालं आणि मैदानावर पाणी साचून राहिल्यानं सामना रद्द करावा लागला. या सामन्यात नाणेफेकही झाली नाही. आता दोन्ही संघांचा एकेक सराव सामना शिल्लक आहे. वर्ल्ड कप स्पर्धेला सामोरे जाण्यापूर्वी टीम इंडियानं तिरंगी मालिकेत ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या बलाढ्य संघांचा सामना केला. या तिरंगी मालिकेतून भारतीय संघानं वर्ल्ड कपची तयारी केली आहे. या तिरंगी मालिकेत टीम इंडियाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. पाकिस्तानला दुसरा सराव सामना 20 फेब्रुवारीला बांगलादेशविरुद्ध, तर भारताला 18 फेब्रुवारीला वेस्ट इंडिजविरुद्ध खेळावे लागणार आहे.

 भारतीय संघाचे वेळापत्रक21 फेब्रुवारी - भारत वि. ऑस्ट्रेलिया - दुपारी 1.30 वा.24 फेब्रुवारी - भारत वि. बांगलादेश - सायं. 4.30 वा.27 फेब्रुवारी - भारत वि. न्यूझीलंड - सकाळी 9.30 वा.29 फेब्रुवारी - भारत वि. श्रीलंका - दुपारी 1.30 वा.

टॅग्स :आयसीसी विश्वचषक टी-२०आयसीसी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2020भारत विरुद्ध पाकिस्तान