SL W vs SA W 18th Match Sri Lanka Vishmi Gunaratne Suffered An Unfortunate Injury : महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील १८ व्या सामन्यात श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका हे दोन संघ समोरासमोर आले आहेत. कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियमवरील लढतीत श्रीलंकेच्या संघाने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला. पावसाच्या व्यत्ययामुळे १२ व्या षटकात खेळ थांबवण्यात आला त्यावेळी श्रीलंकेच्या संघाने २ विकेट्सच्या मोबदल्यात ४६ धावा केल्या होत्या. या सामन्यात श्रीलंकेच्या डावात एक धक्कादायक घटना घडली. सलामीची बॅटर विशमी गुणारत्रे थ्रो मारलेला चेंडूवर दुखापतग्रस्त झाली. तिला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर नेण्यात आले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मैदानात नेमकं कधी अन् काय घडलं?
श्रीलंकेच्या डावातील पाचव्या षटकात दक्षिण आफ्रिकेच्या संघाकडून मेरिझॅन कॅप गोलंदाजीला आली. या षटकातील चौथ्या चेंडूवर स्ट्राइकवर असलेल्या विशमी गुणारत्ने हिने मिडऑनच्या दिशेनं फटका मारला आणि एक धाव घेण्यासाठी क्रीज सोडले. तिची विकेट मिळवण्यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूनं मारलेला थ्रो थेट विशमीच्या गुडघ्यावर लागला. त्यानंतर ती वेदनांनी व्याकूळ होत मैदानात पडली. १६ चेंडूत १२ धावांवर असताना तिला स्ट्रेचरवरुन मैदानाबाहेर नेण्यात आले.
AUS vs IND ODI Series Launch Event: 'जानी दुश्मन'सोबत गप्पा मारल्या; मग ते फोटो काढायला गेले, पण... (VIDEO)
तिच्या दुखापतीसंदर्भात श्रीलंकन संघाने दिली माहिती
विशमी गुणारत्नेच्या दुखापतीसंदर्भात श्रीलंकेच्या संघाने अधिकृतरित्या माहिती दिली आहे. एक धाव घेण्याचा प्रयत्न करत असताना मारलेला थ्रो बॅटरच्या डाव्या गुडघ्याला लागला. विमीशीला दुखापत झाली असली तरी ती गंभीर नसून वैद्यकीय उपचारानंतर ती पुन्हा मैदानात उतरु शकते, अशी माहिती श्रीलंकेच्या संघाकडून देण्यात आली आहे. हा संघासाठी मोठा दिलासाच आहे.
श्रीलंकेच्या संघासमोर स्पर्धेत टिकून राहण्याचं मोठं चॅलेंज
श्रीलंकेच्या संघाने आपल्या पहिल्या चार सामन्यात दोन पराभव आणि पावसामुळे दोन अनिर्णित राहिलेल्या सामन्यामुळे फक्त २ गुण खात्यात जमा केले आहेत. आता पुन्हा एकदा पावसाने अडथळा निर्माण केला आहे. जर हा सामना पावसामुळे रद्द झाला तर श्रीलंकेच्या संघाच्या अडचणी आणखी वाढतील. दुसऱ्या बाजूला दक्षिण आफ्रिकेच्या संघाने ४ पैकी ३ सामन्यातील विजयासह ६ गुण खात्यात जमा केले आहेत. हा संघ सेमीच्या अगदी जवळ पोहचला असून एक विजय त्यांना सेमीचं तिकीट मिळवून देण्यास पुरेसा ठरू शकतो.