Join us  

ICC U-19 World Cup 2018-  भारताचा विजय, ऑस्ट्रेलियाला चारली धूळ 

आयसीसी अंडर 19 वर्ल्डकपच्या स्पर्धेत भारतानं ऑस्ट्रेलियाला धूळ चारत विजय मिळवला आहे.  पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखालील टीमनं धुव्वा उडवत दिमाखदार सुरुवात केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2018 4:01 PM

Open in App

न्यूझीलंड : आयसीसी अंडर 19 वर्ल्डकपच्या स्पर्धेत भारतानं ऑस्ट्रेलियाला धूळ चारत विजय मिळवला आहे.  पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखालील टीमनं धुव्वा उडवत दिमाखदार सुरुवात केली आहे. भारतानं दिलेल्या 329 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियानं 228 धावांतच डाव गुंडाळला.नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेणा-या भारतीय संघाने कर्णधार पृथ्वी शॉ (94) मनजोत कालरा (86) आणि शुभम गिल (63) यांच्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर कांगारूंना 329 धावांचं कठीण लक्ष्य दिलं होतं. पृथ्वी शॉनं शानदार खेळी करत  8 चौकार आणि 2 षटकारांसह 94 धावा केल्या होत्या. पृथ्वी शॉनं कालराच्या मदतीनं पहिल्या विकेटसाठी 180 धावांची भागीदारी केली. मनोजनं 86 धावा केल्या. त्यानंतर आलेल्या शुभमन गिलनं जलद 63 धावा उभारल्या.भारताकडून शिवम मावी आणि कमलेश नागरकोटीनं भेदक गोलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाच्या तीन फलंदाजांना बाहेरचा रस्ता दाखवला. तर अभिषेक शर्मा आणि अनुकूल रॉयनं यांनीही प्रत्येकी एक एक बळी मिळवले.

टॅग्स :क्रिकेट