Join us  

आयसीसी कसोटी क्रमवारीत जडेजा, टीम इंडिया अव्वल स्थानावर

नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आयसीसी कसोटी क्रमवारीत भारतीय क्रिकेट संघानं आपले प्रथम स्थान कायम राखलं आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2017 5:00 PM

Open in App

नवी दिल्ली, दि. 1 - नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आयसीसी कसोटी क्रमवारीत भारतीय क्रिकेट संघानं आपले प्रथम स्थान कायम राखलं आहे. गोलंदाजीमध्ये भारतीय अष्टपैलू रविंद्र जडेजाने आपले प्रथम स्थान तर आर. अश्वनंने दुसरे स्थान कायम ठेवलं आहे. लंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत धडाकेबाज शतकी खेळी करणाऱ्या शिखऱ धवनने फलंदाजीच्या क्रमवारीत २१ स्थानाची झेप घेत ३९ व्या स्थानावर विराजमान झाला आहे. कसोटी क्रमवारीत पहिल्या 10 गोलंदाजामध्ये अश्विन आणि जडेजा व्यतिरीक्त एकही खेळाडू नाही. शमी गोलंदाजीच्या क्रमवारीत 23 व्या स्थानी आहे. हेरथ तिसऱ्या स्थानावर तर अँडरसन चौथ्या आणि हेजलवुड पाचव्या क्रमांकावर आहेत. अष्टपैलू खेळाडूमध्ये बांगलादेशचा शाकिब अल हसन पहिल्या स्थानावर कायम आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर भारताचे जडेजा आणि अश्विन कायम आहेत. तिसऱ्या स्थानावर मोईन अली आहे. तर पाचव्या स्थानावर बेन स्टोक आहे.फलंदाजी क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्मिथ प्रथम स्थानावर विराजमान आहे. इंग्लंडचा कर्णधार जो रुट दुसऱ्या स्थानावर आहे. भारताचा चेतेश्वर पुजारा चौथ्या स्थावर आहे. तर भारताचा कर्णधार विराट कोहली पाचव्या स्थावर आहे. पहिल्या दहा फलंदाजामध्ये भारताचे फक्त दोन फलंदाज आहेत.आयसीसी कसोटी क्रमवारीभारत 123दक्षिण आफ्रिका 117ऑस्ट्रेलिया 100इंग्लंड 99न्यूजीलँड 97पाकिस्तान 93श्रीलंका 92८. वेस्ट इंडिज 75बांगलादेश 69आयसीसी कसोटी गोलंदाज क्रमवारीरवींद्र जडेजा 897आर अश्विन 849रंगना हेराथ 828आयसीसी कसोटी फलंदाज क्रमवारीस्टिव्ह स्मिथ 941ज्यो रूट 885विल्यमसन 880चेतेश्वर पुजारा 866विराट कोहली 826आयसीसी कसोटी अष्टपैलू क्रमवारीशाकिब-उल-हसन 431रवींद्र जडेजा 414आर अश्विन 413