Join us  

आयसीसी रॅंकिंगमध्ये टीम इंडियाची बादशाहत कायम, 4 फलंदाजही टॉप 10 मध्ये

श्रीलंकेविरूद्धच्या कसोटी मालिकेत केलेल्या दमदार प्रदर्शनाचा चांगलाच फायदा भारतीय संघाला आणि भारतीय खेळाडूंनाही झाला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2017 6:06 PM

Open in App
ठळक मुद्देश्रीलंकेविरूद्धच्या कसोटी मालिकेत केलेल्या दमदार प्रदर्शनाचा चांगलाच फायदा भारतीय संघाला आणि भारतीय खेळाडूंनाही झालाटॉप 10 टेस्ट रॅंकिंगमध्ये भारताचे 4 फलंदाजपांड्या-शमी-उमेश यादव यांना झाला फायदा रवींद्र जडेजाच्या रॅंकिंगमध्ये घसरण

मुंबई, दि. 15 - विराट कोहलीच्या टीम इंडियाने श्रीलंकेला कसोटी मालिकेत 3-0 ने व्हाइटवॉश दिला. यासोबत कर्णधार विराट कोहलीने श्रीलंकेच्या धरतीवर इतिहास रचला.विदेशी धरतीवर तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत क्लीन स्विप देण्यासाठी भारताला तब्बल 85 वर्ष वाट पाहावी लागली. भारताच्या कसोटी क्रिकेटच्या 85 वर्षांच्या इतिहासात टीम इंडियाने परदेशात क्लीन स्विप मिळवण्याची ही पहिलीच वेळ ठरली. या दमदार प्रदर्शनाचा चांगलाच फायदा भारतीय संघाला आणि भारतीय खेळाडूंनाही झाला. भारतीय संघाने आयसीसी क्रमवारीत आपला दबदबा कायम ठेवला आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या क्रमवारीत टीम इंडियाने आपलं अव्वल स्थान कायम राखलं आहे. श्रीलंकेचा संघ सातव्या क्रमांकावर कायम आहे. टीम इंडिया 125 रेटिंगसह पहिल्या स्थानावर कायम आहे. तर दक्षिण आफ्रिकेचा संघ दुस-या स्थानावर आहे. आफ्रिकेच्या संघापेक्षा भारत 15 अंकांनी पुढे आहे. आफ्रिकेच्या संघाचे 110 रेटिंग आहेत. तिस-या क्रमांकावर इंग्लंडचा संघ आहे. त्यांचे 105 रेटिंग आहेत.टॉप 10 टेस्ट रॅंकिंगमध्ये भारताचे 4 फलंदाज -पल्लेकल कसोटीत 85 धावांची खेळी करणा-या राहुलला दोन स्थानांचा फायदा झाला असून तो 9 व्या क्रमांकावर पोहोचला आहे. यासोबतच टीम इंडियाच्या 4 फलंदाजांनी आयसीसीच्या टॉप 10 रॅंकिंगमध्ये स्थान मिळवलं आहे. यामध्ये चेतेश्वर पुजारा (4), विराट कोहली (5), केएल राहुल(9) आणि अजिंक्य रहाणे (10) यांचा समावेश आहे. पांड्या-शमी-उमेश यादव यांना झाला फायदा-पल्लेकल कसोटीत ऑलराउंडर हार्दिक पांड्याने 96 चेंडूंमध्ये 108 धावांची खेळी केली. त्याचा त्याला चांगलाच फायदा झाला असून आयसीसी क्रमवारीत त्याने 45 स्थानांची झेप घेतली आहे. तो फलंदाजांच्या क्रमवारीत 68 व्या क्रमांकावर पोहोचला आहे. करियरमधील त्याची ही बेस्ट रॅंकिंग आहे. याशिवाय जलदगती गोलंदाज मोहम्मद शमीला एका स्थानाचा फायदा झाला असून तो गोलंदाजांच्या क्रमवारीत 19 व्या क्रमांकावर पोहोचला आहे. उमेश यादवलाही एका स्थानाचा फायदा झाला असून तो 21 व्या क्रमांकावर पोहोचला आहे.  रवींद्र जडेजाच्या रॅंकिंगमध्ये घसरण-अष्टपैलूंच्या क्रमवारीत रविंद्र जडेजाची घसरण झाली आहे. त्याचं अव्वल स्थान पुन्हा एकदा बांगलादेशच्या शाकिब अल हसनने मिळवलं आहे. श्रीलंकेच्या मालिकेत तिस-या सामन्यात बंदीमुळे जडेजा खेळू शकला नव्हता, त्यामुळे एका गुणाचा फटका त्याला बसला आणि बांगलादेशच्या शाकिब अल हसनला त्याचा फायदा  झाला.   तरी गोलंदाजांच्या क्रमवारीत जडेजा क्रमांक एकवर कायम आहे. 

टॅग्स :विराट कोहलीबीसीसीआय