Join us  

ICC T20 World Cup 2021, PAK vs SCO: पाकिस्तानची स्कॉटलंडवर ७२ धावांनी दणदणीत मात, उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश; ऑस्ट्रेलियाशी होणार लढत

ICC T20 World Cup 2021, PAK vs SCO, Live: ट्वेन्टी-२० वर्ल्डकपमध्य तुफान फॉर्मात असलेल्या पाकिस्तानच्या संघानं विजयीरथ कायम राखत स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2021 11:13 PM

Open in App

ICC T20 World Cup 2021, PAK vs SCO, Live: ट्वेन्टी-२० वर्ल्डकपमध्य तुफान फॉर्मात असलेल्या पाकिस्तानच्या संघानं विजयीरथ कायम राखत स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे. पाकिस्ताननं स्कॉटलंड विरुद्धचा सामना ७२ धावांनी जिंकला. पाकिस्ताननं उभारलेल्या १९० धावांच्या आव्हानाला सामोरं जाताना स्कॉटलंडला २० षटकांच्या अखेरीस ६ बाद ११७ धावा करता आल्या. पाकिस्तानकडून शादाब खान यानं दोन विकेट्स मिळवल्या, तर शाहिन शाह आफ्रिदी, हारिस रौफ आणि हसन यांनी यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. स्कॉटलंडकडून रिची बेरिंग्टन यानं सर्वाधिक नाबाद ५४ धावा केल्या. 

पाकिस्ताननं स्पर्धेतील फॉर्म कायम ठेवत याही सामन्यात दमदार सुरुवात केली. मोहम्मद रिझवान (१५) लवकर तंबूत दाखल झाला असला तरी कर्णधार बाबर आझमनं ४७ चेंडूत ६६ धावांची खेळी साकारुन आज विराट कोहलीच्या विक्रमाशी बरोबरी केली. ट्वेन्टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत चार अधर्शतकं ठोकली होती. या वर्ल्डकपमध्ये बाबर आझमनं आज चौथं अर्धशतक साकारलं आणि कोहलीच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. आता उपांत्य फेरीच्या लढतीत बाबर आझमच्या कामगिरीकडे लक्ष असणार आहे. पाकिस्तानची उपांत्य फेरीत आता ऑस्ट्रेलिया विरुद्ध लढत होणार आहे. 

पाकिस्तानचं कर्णधार बाबर आझम आणि अनुभव शोएब मलिकनं तुफान फटकेबाजी करत स्कॉटलंडच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. शोएब मलिकनं अखेरच्या षटकांमध्ये चौकार आणि षटकारांची आतषबाजी करत अवघ्या १८ चेंडूत नाबाद ५४ धावा केल्या. तर बाबर आझमनं ४७ चेंडूत ६६ धावांची खेळी भक्कम पाया रचला. बाबर आझमनं ट्वेन्टी-२० वर्ल्डकपमध्ये गेल्या पाच सामन्यांमध्ये चौथ्यांदा अर्धशतकी साकारली आहे.  

सामन्याची नाणेफेक जिंकून पाकिस्ताननं प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मोहम्मद रिझवान यावेळी १५ धावांवर बाद झाला. पण कर्णधार बाबर आझमनं सातत्यपूर्ण खेळीचं दर्शन घडवत याही सामन्यात अर्धशतकी खेळी साकारली. ट्वेन्टी-२० वर्ल्डकपमध्ये चार अर्धशतकं ठोकण्याच्या कोहलीच्या विक्रमाची बाबर आझमनं आज बरोबरी केली आहे. फाकर झमान (८) स्वस्तात बाद झाला. मोहम्मद हाफिजनं १९ चेंडूत ३१ धावा केल्या. अखेरीस शोएब मलिकनं आपल्या अनुभवाचा पुरेपूर वापर करत संघासाठी मोलाचं योगदान दिलं. अवघ्या १८ चेंडूत मलिकनं ५४ धावांची खेळी साकारली. यात मलिकनं ६ खणखणीत षटकार ठोकले. 

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१पाकिस्तान
Open in App