Join us  

T20 World Cup 2021 Ind vs Pak Live Score: Virat Kohliनं आफ्रिदीला खेचला खणखणीत षटकार, Pakistan विरुद्ध नोंदवले अनेक मोठे विक्रम

ICC T20 World Cup 2021 India vs Pakistan Scoreacard Live updates: विराट कोहलीच्या ( Virat Kolhi) च्या दमदार कामगिरीच्या जोरावर भारतानं पाकिस्तानसमोर १५२ धावांचे आव्हानात्मक लक्ष्य ठेवले.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2021 9:55 PM

Open in App

ICC T20 World Cup 2021 India vs Pakistan Scoreacard Live updates: शाहिन शाह आफ्रिदीनं ( Shaheen Shah Afridi) सुरुवातीला धक्के दिल्यानतंरही टीम इंडियानं आजच्या सामन्यात पाकिस्तानसमोर आव्हानात्मक धावसंख्या उभी केली. विराट कोहलीच्या ( Virat Kolhi) च्या दमदार कामगिरीच्या जोरावर भारतानं पाकिस्तानसमोर १५२ धावांचे आव्हानात्मक लक्ष्य ठेवले. विराटनं आजच्या सामन्यात अनेक मोठे विक्रम मोडले. T20 World Cup 2021, T20 World Cup 2021 matches

भारताचे आघाडीचे तीन फलंदाज ३१ धावांवर माघारी परतल्यानंतर कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) आणि रिषभ पंत ( Rishabh Pant) यांनी चौथ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करताना टीम इंडियाचा डाव सावरला. रिषभ पुन्हा एकदा घाई करून माघारी परतला, पण त्यानं त्याची जबाबदारी सक्षमपणे पार पाडली. चौथ्या विकेटसाठी ४० चेंडूंत ५३ धावा जोडल्या आणि यात रिषभच्या ३९ धावा होत्या. विराट ४९ चेंडूंत ५ चौकार व १ षटकार खेचून ५७ धावांवर झेलबाद झाला. भारतानं २० षटकांत ७ बाद १५१ धावा केल्या. T20 World Cup 2021 live updates, T20 World Cup 2021 schedule

  • ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक १० वेळा ५०+ धावा करण्याचा विक्रम आज विराटनं नावावर केला. त्यानं युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलचा ( ९) विक्रम मोडला. माहेला जयवर्धने ( ७), तिलकरत्ने दिलशान ( ६) व रोहित शर्मा ( ६) यांचा क्रमांक नंतर येतो.   
  • पुरूषांच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत ५०+ धावा करणारा पहिल्या भारतीय कर्णधाराचा मानही विराटनं पटकावला. 
  • आयसीसी स्पर्धांमध्ये पाकिस्तानविरुद्ध ५००+ धावा करणारा विराट हा पहिलाच फलंदाज ठरला. विराटनं ५१२+ धावा केल्या आहेत. त्यानंतर रोहित शर्मा ( ३२८), सचिन तेंडुलकर ( ३२१) आणि शाकिब अल हसन ( २८४) यांचा क्रमांक येतो.  

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१विराट कोहलीभारत विरुद्ध पाकिस्तान
Open in App