T20 World Cup 2021 Ind vs Pak Live Score: पाकिस्तानी महिला अँकरची MS Dhoni, KL Rahul कडे विनवणी; चॅनेलच्या गाण्यानं तर हद्दच केली, Video

T20 World Cup 2021 Ind vs Pak Scorecard: भारत-पाकिस्तान ( India vs Pakistan) यांच्यात जवळपास दोन वर्षांनंतर क्रिकेट सामना होत आहे. २०१९च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत India vs Pakistan यांच्यात सामना झाला होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2021 03:23 PM2021-10-24T15:23:13+5:302021-10-24T15:24:43+5:30

ICC T20 World Cup 2021 Ind vs Pak Live updates : Pakistani anchor asking KL Rahul & MS Dhoni not to play well tomorrow, Pakistan reply to indian "mauka mauka", Video  | T20 World Cup 2021 Ind vs Pak Live Score: पाकिस्तानी महिला अँकरची MS Dhoni, KL Rahul कडे विनवणी; चॅनेलच्या गाण्यानं तर हद्दच केली, Video

T20 World Cup 2021 Ind vs Pak Live Score: पाकिस्तानी महिला अँकरची MS Dhoni, KL Rahul कडे विनवणी; चॅनेलच्या गाण्यानं तर हद्दच केली, Video

Next

ICC T20 World Cup 2021 India vs Pakistan Scoreacard Live updates: आज सायंकाळी बरोबर ७ वाजता दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर विराट कोहली ( Virat Kohli ) आणि बाबर आजम ( Babar Azam) हे जगातील दोन अव्वल फलंदाज समोरासमोर येतील. भारत-पाकिस्तान ( India vs Pakistan) यांच्यात जवळपास दोन वर्षांनंतर क्रिकेट सामना होत आहे. २०१९च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत India vs Pakistan यांच्यात सामना झाला होता. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांची उत्सुकता आणखी शिगेला पोहोचली आहे. या सामन्याचे वातावरण तापू लागले आहेत आणि पाकिस्तानी चॅनेल वाल्यांनी अकलेचे तारे तोडण्यास सुरुवात केली आहे. ( सामन्याचं संपूर्ण धावफलक)

या सामन्यासाठी दोन्ही संघांनी आयसीसी अकादमीच्या मैदानावर कसून सराव केला. शनिवारी हे दोन्ही संघ एकमेकांसमोर आले आणि त्यांचे सराव सत्र पाहण्यासाठी आलेले दोन्ही देशांचे चाहत्यांच्या जयघोषानं स्टेडियम दणाणून गेले. यावेळी पाकिस्तानी महिला अँकरनं भारताचा माजी कर्णधार व मेंटॉर महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) व लोकेश राहुल ( KL Rahul) यांच्याकडे विचित्र मागणी केली. पाकिस्तानची ही महिला फॅन चक्क धोनी व राहुल यांना पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात चांगली कामगिरी करू नका, अशी विचित्र मागणी करताना दिसली. T20 World Cup 2021, T20 World Cup 2021 matches

राहुलने ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये चांगल्या फॉर्मात आहे. त्यानं आयपीएल २०२१तही दमदार फलंदाजी केली आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या चाहत्यांनी राहुलची धास्ती घेतली आहे. त्यामुळे पाकिस्तानची ही तरूणी राहुलला चांगली फलंदाजी करू नकोस, असं म्हणाली आहे. धोनीला ती म्हणाली की, ‘माही नॉट धिस मॅच प्लीज’. त्यावर धोनीनं तिला चोख प्रत्युत्तर देताना, हे तर माझे काम आहे, अशी प्रतिक्रिया दिली.  T20 World Cup 2021 live updates, T20 World Cup 2021 scheduleहे कमी होतं की काय. पाकिस्तानी चॅनेलनं मौका मौकाला टक्कर देण्यासाठी गाणं तयार केलं आणि ते पाहून सर्व लोटपोट होत आहेत.

Web Title: ICC T20 World Cup 2021 Ind vs Pak Live updates : Pakistani anchor asking KL Rahul & MS Dhoni not to play well tomorrow, Pakistan reply to indian "mauka mauka", Video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app