T20 World Cup 2021 Ind vs Pak Live Score: पाकिस्तानच्या बाजूनं नाणेफेकीचा कौल लागला, विराट कोहलीनं तगडा संघ मैदानावर उतरवला

हार्दिक पांड्या हा आजच्या सामन्यातील चर्चेचा विषय होता आणि तो किमान दोन षटकं टाकेल असे संकेत विराटनं दिले होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2021 07:03 PM2021-10-24T19:03:10+5:302021-10-24T19:07:18+5:30

ICC T20 World Cup 2021 Ind vs Pak Live updates : Pakistan won the toss and decided to bowl first, know both team playing Xi | T20 World Cup 2021 Ind vs Pak Live Score: पाकिस्तानच्या बाजूनं नाणेफेकीचा कौल लागला, विराट कोहलीनं तगडा संघ मैदानावर उतरवला

T20 World Cup 2021 Ind vs Pak Live Score: पाकिस्तानच्या बाजूनं नाणेफेकीचा कौल लागला, विराट कोहलीनं तगडा संघ मैदानावर उतरवला

Next

ICC T20 World Cup 2021 India vs Pakistan Scoreacard Live updates: भारत-पाकिस्तान बहुप्रतिक्षित सामन्यातील नाणेफेकीचा कौल बाबर आजमच्या बाजूनं लागला आणि त्यांनी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्ताननं हैदर अलीला बाहेर ठेवताना युवा व अनुभवी खेळाडूंसह खेळणे पसंत केलं. विराट कोहलीनंही ( Virat Kohli) प्रथम गोलंदाजी करायला आवडले असते असे प्रांजळ मत व्यक्त केले. विराटनं आजच्या सामन्यासाठी इशान किशन, आर अश्विन, राहुल चहर यांना संधी दिली नाही. भारत-पाकिस्तान यांच्यातला हा २०० वा सामना आहे.  ( Today is the 200th international match between India and Pakistan.)

हार्दिक पांड्या हा आजच्या सामन्यातील चर्चेचा विषय होता आणि तो किमान दोन षटकं टाकेल असे संकेत विराटनं दिले होते. त्यामुळे सहाव्या गोलंदाजाची टीम इंडियाला चिंता सतावत होती. नाणेफेकीपूर्वी विराट सर्वात आधी मैदानावर आला. आर अश्विन, राहुल चहर आणि रवींद्र जडेजा यांनी गोलंदाजीचा सराव केला. त्यामुळे नेमकी कोणती रणनीती टीम इंडियानं आखलीय हे समजणं अवघड होतं. विराटनंही फिरकी व मध्यमगती अशा दोन्ही स्टाईलनं नेट्समध्ये गोलंदाजी केली. शनिवारच्या दुसऱ्या सत्रात सूर्यकुमार यादवनंही गोलंदाजी केली. 

भारत-पाकिस्तान वर्ल्ड कप लढतींचा इतिहास! 
 

२००७ च्या वर्ल्ड कप स्पर्धेत भारत-पाकिस्तान दोन वेळा समोरासमोर आले होते. साखळी फेरीतल्या पहिल्या सामन्यात भारताच्या ९ बाद १४१ धावांच्या प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ १४१ धावा करू शकला. त्यामुळे सामना टाय झाला आणि बॉल आउटमध्ये भारताने ३-० ने बाजी मारली. त्यानंतर अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानला पराभूत करत जेतेपद नावावर केले. पाकिस्तानला १५८ धावांचं लक्ष्य दिल्यानंतर भारतीय संघाने ५ धावांनी जिंकला होता. अखेरच्या षटकात जोगिंदर सिंगच्या गोलंदाजीवर एस श्रीसंतनं झेल घेत भारताचा विजय पक्का केला होता. 

२०१२च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्येपाकिस्ताननं प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर १२८ धावांचं लक्ष्य ठेवलं आणि टीम इंडियानं २ विकेट्स गमावत हे लक्ष्य सहज पार केलं. २०१४ मध्ये भारताने ७ विकेट्स राखून विजय मिळवला होता. पाकिस्तानचे ७ बाद १३० धावांचं आव्हान  भारताने ३ विकेट्स गमावून पार केलं. २०१६मध्ये कोलकाताच्या ईडन गार्डनवर पाकिस्ताननं विजयासाठी ठेवलेलं ११९ धावांचं आव्हान भारताने ६ विकेट्स राखून पार केलं. 

दोन्ही संघ
भारत - लोकेश राहुल, रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, हार्दिक पांड्या  रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, वरुण चक्रवर्थी ( India playing XI vs Pakistan: Rohit Sharma, KL Rahul, Virat Kohli(c), Suryakumar Yadav, Rishabh Pant(w), Hardik Pandya, Ravindra Jadeja, Bhuvneshwar Kumar, Mohammed Shami, Varun Chakaravarthy, Jasprit Bumrah) 

पाकिस्तान - बाबर आजम, मोहम्मद रिझवान, फाखर जमान, मोहम्मद हाफिज, शोएब मलिक, आसीफ अली, इमाद वासीम, शाबाद खान, हसन अली, शाहिन आफ्रिदी, हॅरीस रौफ 
 

Web Title: ICC T20 World Cup 2021 Ind vs Pak Live updates : Pakistan won the toss and decided to bowl first, know both team playing Xi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app