Join us  

T20 World Cup 2021 Ind vs Pak Live Score: ही सुरुवात आहे, शेवट नाही..; पाकिस्तानकडून लाजीरवाण्या पराभवानंतर विराट कोहली म्हणतो...

 ICC T20 World Cup 2021 India vs Pakistan Scoreacard Live updates: पाकिस्तानचा संघ आज सर्व आघाड्यांवर टीम इंडियावर भारी पडला.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2021 11:23 PM

Open in App

 ICC T20 World Cup 2021 India vs Pakistan Scoreacard Live updates: पाकिस्तानचा संघ आज सर्व आघाड्यांवर टीम इंडियावर भारी पडला. गोलंदाजीत शाहिन शाह आफ्रिदीनं धक्के दिल्यानंतर फलंदाजीत बाबर आजम आणि मोहम्मद रिझवान ही जोडी सुसाट खेळली. त्यांनी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत १५२ धावांची विक्रमी भागीदारी करताना टीम इंडियावर १० विकेट्स राखून विजय मिळवला. भारतीय सलामीवीर अपयशी ठरलेच, शिवाय गोलंदाजांनीही निराश केले. 

शाहिन शाह आफ्रिदीनं आजच्या सामन्यात रोहित शर्मा, लोकेश राहुल व विराट कोहली या तीन महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या. कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) आणि रिषभ पंत ( Rishabh Pant) यांनी ४० चेंडूंत ५३ धावा जोडल्या आणि यात रिषभच्या ३९ धावा होत्या. विराट ४९ चेंडूंत ५ चौकार व १ षटकार खेचून ५७ धावांवर झेलबाद झाला. भारतानं २० षटकांत ७ बाद १५१ धावा केल्या. T20 World Cup 2021, T20 World Cup 2021 matches

बाबर आजम आणि मोहम्मद रिझवान ही फॉर्मात असलेली जोडी टीम इंडियावर भारी पडली. या दोघांनी वैयक्तिक अर्धशतकांसह पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. बाबर ५२ चेंडूंत ६ चौकार व २ षटकारांसह नाबाद ६८ धावा केल्या. रिझवान ५५ चेंडूंत ६ चौकार व ३ षटकारांसह ७८ धावा केल्या. पाकिस्ताननं १७.५ षटकांत बिनबाद १५२ धावा केल्या.

विराट कोहली काय म्हणाला?आम्ही आखलेल्या रणनीतीची अंमलबजावणी करू शकलो नाही, परंतु पाकिस्तानला विजयाचे श्रेय द्यायला हवं. त्यांनी आज अप्रतिम खेळ केला. जेव्हा आघाडीचे तीन फलंदाज झटपट माघारी परतात, तेव्हा कमबॅक करणं खरंच अवघड असतं. विषेशतः जेव्हा मैदानावर दव फॅक्टर महत्त्वाचा असतो. पाकिस्ताननं गोलंदाजी आणि फलंदाजीत प्रोफेशनल खेळ केला. पहिल्या डावात चेंडूवर जोरदार फटका मारणं सोपं नव्हतं, ते पाकिस्तानच्या डावात सोपं झालं. त्यामुळे जेव्हा तुम्हाला माहीत असतं की परिस्थिती बदलणार आहे, तेव्हा १०-२० धावा अतिरिक्त करायला हव्या होत्या. या पराभवानं पॅनिक होऊ नका, ही सुरुवात आहे, शेवट नाही.''

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१भारत विरुद्ध पाकिस्तानविराट कोहली
Open in App