Join us  

T20 World Cup 2021 Ind vs Pak Live Score: No-Ball वर घेतली KL Rahulची विकेट?; खराब अम्पायरींगवर भारतीय चाहते खवळले

ICC T20 World Cup 2021 India vs Pakistan Scoreacard Live updates: रोहित शर्मा ( Rohit Sharma) व लोकेश राहुल ( KL Rahul) यांनी डावाची सुरुवात केली. पण, भारताला पहिल्याच षटकात धक्का दिला.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2021 8:44 PM

Open in App

ICC T20 World Cup 2021 India vs Pakistan Scoreacard Live updates: शाहिन शाह आफ्रिदीनं भारतीय सलामीवीरांना माघारी पाठवून टीम इंडियाची अवस्था बिकट केली. शाहिननं पहिल्याच षटकात हिटमॅन रोहित शर्माला LBW केलं आणि त्यानंतर लोकेश राहुलचा त्रिफळा उडवला. पण, लोकेशची ज्या चेंडूवर विकेट मिळाली, तो No Ball असल्याचा दावा भारतीय चाहत्यांकडून केला जात आहे. 

रोहित शर्मा ( Rohit Sharma) व लोकेश राहुल ( KL Rahul) यांनी डावाची सुरुवात केली. पण, भारताला पहिल्याच षटकात धक्का दिला. शाहिन शाह आफ्रिदी ( Shaheen Afridi ) यानं पहिल्याच षटकात टीम इंडियाला मोठा धक्का दिला. लोकेशनं तिसऱ्या चेंडूवर एक धाव घेत रोहितला स्ट्राईक दिली. पण, शाहिनच्या भेदक व आता येणाऱ्या चेंडूनं त्याची विकेट घेतली. रोहितला काही समजण्यापूर्वीच शाहिननं टाकलेला चेंडू रोहितच्या पायावर आदळला अन् LBW ची जोरदार अपील झाली. अम्पायरनंही लगेच हात वर केला व रोहित गोल्डन डकवर बाद झाला. T20 World Cup 2021, T20 World Cup 2021 matches,

लोकेश राहुलही ( ३) त्रिफळाचीत झाला. भारताचे दोन्ही सलामीवीर ६ धावांवर माघारी परतल्यानंतर कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) आणि सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) यांनी सुरुवातीला सावध खेळ करताना डाव सावरण्याचा प्रयत्न केला. दोन्ही फलंदाज तणावात दिसत होते. त्यातही ते डाव सावरण्यासाठी प्रयत्नशील होते, परंतु सहाव्या षटकात हसन अली गोलंदाजीला आला अन् त्यानं ही जोडी तोडली. चौथ्या चेंडूवर सूर्यकुमार ( ११) बाद झाला. World Cup 2021 live matches, Ind vs Pak live match

 

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१लोकेश राहुलभारत विरुद्ध पाकिस्तान
Open in App