Join us  

T20 World Cup 2021 Ind vs NZ Live Score: रोहित शर्माच्या एका चुकीमुळे पत्नी रितिकाच्या काळजाचा ठोका चुकला, अश्विनच्या पत्नीनं धीर दिला, Video

ICC T20 World Cup 2021 India vs New Zealand  Scoreacard Live updates : सूर्यकुमार यादव आणि भुवनेश्वर कुमार यांच्या जागी आजच्या लढतीत टीम इंडियानं इशान किशन व शार्दूल ठाकूर यांना संधी दिली. सूर्यकुमारला पाठ दुखीमुळे बीसीसीआयच्या वैद्यकीय टीमनं विश्रांतीचा सल्ला दिला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2021 8:03 PM

Open in App

ICC T20 World Cup 2021 India vs New Zealand  Scoreacard Live updates : भारत-न्यूझीलंड यांच्यातला हा सामना खऱ्या अर्थानं उपांत्यपूर्व फेरीचा सामना आहे. या सामन्यातील विजयी संघ उपांत्य फेरीच्या दिशेनं एक पाऊल पुढे टाकेल आणि त्यामुळेच दोन्ही संघ ताकदीनं मैदानावर उतरले आहेत. न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन यानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या रोहित शर्मानं ( Rohit Sharma) पहिल्याच चेंडूवर पत्नी रितिका ( Ritika) सह सर्वांच्या काळजाचा ठोका चुकवला होता. ( संपूर्ण धावफलक पाहण्यासाठी क्लिक करा

सूर्यकुमार यादव आणि भुवनेश्वर कुमार यांच्या जागी आजच्या लढतीत टीम इंडियानं इशान किशन व शार्दूल ठाकूर यांना संधी दिली. सूर्यकुमारला पाठ दुखीमुळे बीसीसीआयच्या वैद्यकीय टीमनं विश्रांतीचा सल्ला दिला आहे. रोहित शर्मा  संघात असूनही इशान किशन व लोकेश राहुल ही जोडी सलामीला आली. दोघांनी सुरुवातीला संयम दाखवला, परंतु इशाननं तिसऱ्या षटकात चौकार मारून माहोल बदलण्याचा प्रयत्न केला. पण, ही अती घाई महागात पडली अन् ट्रेंट बोल्टनं त्याची विकेट घेतली. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या रोहितचा पहिल्याच चेंडूवर अॅडम मिल्नेनं सोपा झेल सोडला.  T20 World Cup 2021 live updates, T20 World Cup 2021 schedule,  

रोहितनं मारलेल्या पुल शॉटनंतर चेंडू हवेत होता अन् सीमारेषेवर मिल्ने उभाच होता. रोहित भोपळ्यावर बाद होतोय की काय असेच वाटत होते आणि प्रेक्षकांमध्ये बसलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर टेंशन दिसले. त्याला रोहितची पत्नी रितिकाही अपवाद ठरली नाही. पण, मिल्नेनं सोपा झेल सोडताच प्रेक्षकांप्रमाणे तिनंही सुटकेचा निश्वास टाकला. आर अश्विनची पत्नी तिला धीर देताना दिसली. पण, त्यानंतर मिल्नेच्या गोलंदाजीवर रोहितनं मारलेला षटकार अप्रतिम  होता.       पण, टीम साऊदीनं टीम इंडियाला दुसरा धक्का देताना लोकेशला माघारी जाण्यास भाग पाडले. भारतानं ३५ धावांवर दोन्ही सलामीवीर गमावले.

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१रोहित शर्माभारत विरुद्ध न्यूझीलंड
Open in App