T20 World Cup 2021 Eng vs WI Live Score: अकिल होसैननं घेतली कॅच ऑफ दी टुर्नामेंट; पण त्यावरून सुरू झालाय वाद, Watch Video

ICC T20 World Cup 2021 England vs West Indies Scoreacard Live updates : इंग्लंडच्या मोईन अली व आदिल राशिद यांनी वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात उल्लेखनीय कामगिरी केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2021 10:30 PM2021-10-23T22:30:59+5:302021-10-23T22:31:26+5:30

ICC T20 World Cup 2021 Eng vs WI Live updates : Catch of the tournament from Akeal Hosein, but Did that look out or not out?, Video | T20 World Cup 2021 Eng vs WI Live Score: अकिल होसैननं घेतली कॅच ऑफ दी टुर्नामेंट; पण त्यावरून सुरू झालाय वाद, Watch Video

T20 World Cup 2021 Eng vs WI Live Score: अकिल होसैननं घेतली कॅच ऑफ दी टुर्नामेंट; पण त्यावरून सुरू झालाय वाद, Watch Video

Next

ICC T20 World Cup 2021 England vs West Indies Scoreacard Live updates : इंग्लंडच्या मोईन अली व आदिल राशिद यांनी वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात उल्लेखनीय कामगिरी केली. २०१६च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील फायनलमध्ये विंडीजनं इंग्लंडला पराभवाची मोठी जखम दिली होती. त्यानंतर पाच वर्षांनी हे संघ वर्ल्ड कपमध्ये भिडले अन् इंग्लंडनं सव्याज परतफेड केली. मोईन अली ( Moeen Ali) व आदिल राशिद ( Adil Rashid) यांनी मिळून ६ विकेट्स घेतल्या आणि वेस्ट इंडिजचा संघ ५५ धावांवर माघारी परतला. प्रत्युत्तरात इंग्लंडनं ८.२ षटकांत ४ विकेट्सच्या मोबदल्यात हे लक्ष्य पार केले. विंडीजच्या अकिल होसैननं ( Akeal Hosein) उल्लेखनीय कामगिरी केली. त्यानं  Catch of the tournament घेतला, परंतु त्यानं नवा वाद सुरू झाला..

४१ वर्षीय ख्रिस गेल ( १३) वगळता विंडीजचे ९ फलंदाज एकेरी धावसंख्येवर बाद झाले.  मोईन अलीनं ४ षटक, १ निर्धाव, १७ धावा, २ विकेट्स अशी उल्लेखनीय गोलंदाजी केली. राशिदनं २ धावा देताना ४ विकेट्स घेतल्या. जेसन रॉय व जोस बटलर ही जोडीच हे माफक लक्ष्य पार करेल, असे वाटत होते. पण, रॉय ११ धावांवर माघारी परतला, त्यानंतर आलेला जॉनी बेअरस्टो ९ धावा करून बाद झाला. रवी रामपॉलनं इंग्लंडच्या रॉयला ख्रिस गेलकरवी झेलबाद केले आणि गेलची ही ट्वेंटी-२०तील १००वी कॅच ठरली. अकील होसैननं त्याच्याच गोलंदाजीवर बेअरस्टोची कॅच टिपली. मोईन अलीही उगाच घाई करून ३ धावांवर धावबाद झाला. विंडीज पराभवाच्या उंबरठ्यावर असताना होसैननं एक अफलातून झेल घेतला. लाएम लिव्हिंगस्टोन ( १) स्वस्तात माघारी परतला. पण, लाएम बाद की नाबाद, यावरून वाद सुरू झाला आहे.

पाहा व्हिडीओ...


Web Title: ICC T20 World Cup 2021 Eng vs WI Live updates : Catch of the tournament from Akeal Hosein, but Did that look out or not out?, Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app