Join us  

आयसीसी रँकिंग : जाडेजाची बादशाहत संपुष्टात, अँडरसन अव्वल स्थानावर

इंग्लंडचा तेजतर्रार गोलंदाज जेम्स अँडरसनने नुकत्याच जाहिर झालेल्या आयसीसी कसोटी क्रमवारीत जाडेजाची बादशाहत संपुष्टात आणत अव्वल स्थान काबिज केलं आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2017 6:52 PM

Open in App

दुबई, दि. 10 - इंग्लंडचा तेजतर्रार गोलंदाज जेम्स अँडरसनने नुकत्याच जाहिर झालेल्या आयसीसी कसोटी क्रमवारीत जाडेजाची बादशाहत संपुष्टात आणत अव्वल स्थान काबिज केलं आहे. जेम्स अँडरसनच्या कसोटी कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरीच्या बळावर इंग्लंडने शनिवारी लॉर्डस्वर वेस्ट इंडिजविरुद्ध तिस-या कसोटी सामन्यात ९ गडी राखून विजय नोंदवताना ३ सामन्यांची मालिका २-१ अशी जिंकली. या मालिकेत अँडरसनने आपले 500 बळीही पुर्ण केलेत. अशी कामगिरी करणारा तो सहावा गोलदाज ठरला आहे. या मालिकेतील उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर त्यानं आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर झेप घेतली आहे. अँडरसनच्या नावावर आता 896 गुण आहेत. तर जाडेजा 884 गुणासह दुसऱ्या स्थानावर आहे. भारताचा दुसरा फिरकी गोलंदाज आश्विन तिसऱ्या स्थानावर कायम आहे.

फलंदाजीच्या कसोटी क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्मिथ अव्वल स्थानावर आहे. जो रूट दुसऱ्या, विल्यमस्न तिसऱ्या, पुजारा चौथ्या स्थानावर आहेत. भारतीय कर्णधार विराट कोहलीची पाचव्या स्थानावरुन सहाव्या स्थानावर घसरण झाली आहे. तर अजिंक्य रहाणे आणि राहुल टॉप टेनमध्ये जागा मिळवण्यात यशस्वी ठरले आहेत. श्रीलंकेच्या मालिकेपूर्वी 11 व्या क्रमांकावर असणा-या राहुलला सातत्यपूर्ण कामगिरीचा चांगलाच फायदा झाला. त्याने पहिल्यांदाच टॉप 10 फलंदाजांमध्ये स्थान मिळवलं असून तो 9 व्या स्थानावर आला आहे.

अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत बांगलादेशचा शाकिब अल हसन प्रथम क्रमांकावर विराजमान आहे. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर अनुक्रमे जाडेजा  अश्विन कायम आहेत.टॉप 10 टेस्ट रँकिंगमध्ये भारताचे 4 फलंदाज -पल्लेकल कसोटीत 85 धावांची खेळी करणा-या राहुलला दोन स्थानांचा फायदा झाला असून तो 9 व्या क्रमांकावर पोहोचला आहे. यासोबतच टीम इंडियाच्या 4 फलंदाजांनी आयसीसीच्या टॉप 10 रँकिंगमध्ये स्थान मिळवलं आहे. यामध्ये चेतेश्वर पुजारा (4), विराट कोहली (6), केएल राहुल(9) आणि अजिंक्य रहाणे (10) यांचा समावेश आहे.

जेम्स अँडरसनची विक्रमाला गवसणी, 500 बळी घेणारा सहावा गोलंदाज

इंग्लंडचा जलदगती गोलंदाज जेम्स अँडरसन हा ५०० विकेट्स घेणारा जगातील सहावा तर इंग्लंडचा पहिला गोलंदाज ठरला आहे. अँडरसन त्याच्या कसोटी क्रिकेट कारकिर्दीतील 500 बळी पूर्ण केले आहेत. लॉर्ड्सवर वेस्ट इंडीजविरुद्ध तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी वेस्ट इंडीजचा सलामीवीर क्रेग ब्राथवेटला बाद करत जेम्स अँडरसनने कारकिर्दितील 500 कसोटी बळी पूर्ण केले. 129 कसोटी सामन्यामध्ये अँडरसनने 500 बळी घेतले आहेत.इंग्लंडसाठी 500 विकेट्स घेणारा अँडरसन हा पहिलाच गोलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन 800 कसोटी बळी, ऑस्ट्रेलियाचा शेन वॉर्न 708 कसोटी बळी, भारताचा अनिल कुंबळे 619 कसोटी बळी, ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज ग्लेन मॅग्रा5630 कसोटी बळी तर वेस्ट इंडीजचा कोर्टनी वॉल्श 519 कसोटी बळी घेतले आहेत. तेजतर्रार गोलंदाज जेम्स अँडरसनच्या कसोटी कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरीच्या बळावर इंग्लंडने काल लॉर्डस्वर वेस्ट इंडिजविरुद्ध तिस-या कसोटी सामन्यात ९ गडी राखून विजय नोंदवताना ३ सामन्यांची मालिका २-१ अशी जिंकली. अँडरसनने २०.१ षटकांत ४२ धावांत ७ गडी बाद केले. त्याच्या या शानदार कामगिरीच्या बळावर इंग्लंडने वेस्ट इंडिजचा दुसरा डाव तिस-या दिवशी १७७ धावांत गुंडाळला. ३५ वर्षीय अँडरसनने याआधी २००८ मध्ये ट्रेंटब्रिजवर न्यूझीलंडविरुद्ध १२९ कसोटी कारकिर्दीतील सर्वोत्तम ४३ धावांत ७ बळी ही कामगिरी मागे टाकली. अँडरसनने लॉर्डस्वर कसोटी डावात पाच किंवा त्यापेक्षा जास्त बळी घेण्याची पाचव्यांदा किमया साधली. इंग्लंडचा महान अष्टपैलू इयान बॉथमने अशी कामगिरी लॉर्डस्वर सर्वात जास्त आठ वेळेस केली आहे. 

 

टॅग्स :क्रिकेटभारतीय क्रिकेट संघ