दक्षिण आफ्रिकेची Semi च्या दिशेने कूच; न्यूझीलंड हरल्याने पाकिस्तानला बुस्टर डोस

ICC ODI World Cup SA vs NZ Live : वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेने आज पाकिस्तानसाठी 'बुस्टर' विजय मिळवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2023 09:11 PM2023-11-01T21:11:14+5:302023-11-01T21:11:44+5:30

whatsapp join usJoin us
ICC ODI World Cup SA vs NZ Live : South Africa beat New Zealand by 190 runs, Pakistan are back in the race for the semis  | दक्षिण आफ्रिकेची Semi च्या दिशेने कूच; न्यूझीलंड हरल्याने पाकिस्तानला बुस्टर डोस

दक्षिण आफ्रिकेची Semi च्या दिशेने कूच; न्यूझीलंड हरल्याने पाकिस्तानला बुस्टर डोस

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ICC ODI World Cup SA vs NZ Live : वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेने आज पाकिस्तानसाठी 'बुस्टर' विजय मिळवला. ३५७ धावांचे आव्हान उभे केल्यानंतर आफ्रिकेला पराभूत करणे न्यूझीलंडसाठी अशक्यच होते. तरीही त्यांच्याकडून कडवी टक्कर अपेक्षित होती. पण, आफ्रिकेच्या भेदक माऱ्यासमोर त्यांनी शेपूट टाकले. आफ्रिकेने १९० धावांच्या विजयासह गुणतालिकेत पुन्हा अव्वल स्थान पटकावले. १२ गुण व सरस नेट रन रेटच्या जोरावर त्यांनी टीम इंडियाला मागे ढकलले. आफ्रिकेचा हा विजय पाकिस्तानच्या उपांत्य फेरीच्या आशा जीवंत ठेवणारा ठरला आहे. 


क्विंटन डी कॉक आणि रॅसी व्हॅन डेर ड्युसेन यांच्या शतकांसह तिसऱ्या विकेटसाठी केलेल्या २०० धावांच्या भागीदारीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने ४ बाद ३५७ धावांपर्यंत मजल मारली. वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक ९ वेळा ३५०+ धावा करण्याच्या ऑस्ट्रेलियाच्या विक्रमाशी आज दक्षिण आफ्रिकेने बरोबरी केली.  क्विंटनने ११६ चेंडूंत १० चौकार व ३ षटकारांसह ११४ धावांची खेळी करताना डेर ड्युसेनसोबत १८९ चेंडूंत २०० धावा जोडल्या.  डेर ड्युसेने ११८ चेंडूंत ९ चौकार व ५ षटकारांसह १३३ धावांवर बाद झाला. डेर ड्युसेनने डेव्हिड मिलरसह ४३ चेंडूंत ७८ धावांची भागीदारी केली. मिलरने ३० चेंडूंत २ चौकार व ४ षटकारांसह ५३ धावा केल्या. न्यूझीलंडच्या क्षेत्ररक्षकांच्या चुका आज आफ्रिकेच्या पथ्यावर पडल्या. 


न्यूझीलंडचा खेळ गंडलेला दिसला. सलामीवीर डेव्हॉन कॉनवे ( २) व रचिन रवींद्र ( ९) यांना मार्को यानसेन याने घरचा रस्ता दाखवल्यावर किवींचे कमबॅक अशक्य होते. दोन फॉर्मात असलेले फलंदाज अपयशी ठरल्याने पुढील सर्व भार मधल्या फळीवर आला. विल यंग ( ३३) चांगला खेळत होता, परंतु गेराल्ड कोएत्झीने त्याची विकेट मिळवली. कागिसो रबाडाने कर्णधार टॉम लॅथमला ( ४) बाद केल्यानंतर केशव महाराजने  डॅरिल मिचेल ( २४) व मिचेल सँटनर ( ७) यांना माघारी पाठवले. न्यूझीलंडचे ६ फलंदाज १०० धावांवर बाद झाले. यानसेनने पुन्हा एक धक्का देताना टीम साऊदीची विकेट मिळवली. महाराज दुसऱ्या बाजूने धक्के देत राहिला. न्यूझीलंडचा संपूर्ण संघ ३५.३ षटकांत १६७ धावांवर तंबूत परतला. ग्लेन फिलिप्सने चांगली फटकेबाजी करून ५० चेंडूंत ४ चौकार व ४ षटकारांसह ६० धावा चोपल्या. केशव महाराजने ४ व मार्को यानसेनने ३ विकेट घेतल्या. 

पाकिस्तानचा फायदा... 


पाकिस्तानला उपांत्य फेरीसाठी उर्वरित २ सामन्यांत न्यूझीलंड व इंग्लंडचा सामना करायचा आहे आणि त्यांना हे दोन्ही सामने सर्वोत्तम नेट रन रेटने जिंकणे महत्त्वाचे आहेत. त्यात जर त्यांनी १ विजय मिळवल्यास न्यूझीलंड/ऑस्ट्रेलिया यांनी तिन्ही सामने हरणे गरजेचे होईल. त्याचवेळी अफगाणिस्तानने २/३ सामने गमावणे महत्वाचे. न्यूझीलंड पुढील दोन सामन्यांत पाकिस्तान व श्रीलंकेचा सामना करणार आहे. 
 

 

Web Title: ICC ODI World Cup SA vs NZ Live : South Africa beat New Zealand by 190 runs, Pakistan are back in the race for the semis 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.