Join us  

क्विं'टन'! डी कॉकचे चौथे शतक; वर्ल्ड कप स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेकडून रेकॉर्ड ब्रेकींग खेळी

ICC ODI World Cup SA vs NZ Live :  दक्षिण आफ्रिकेने हा वन डे वर्ल्ड कप गाजवला आहे. त्यांच्या फलंदाजांच्या फटकेबाजीने प्रतिस्पर्धी गोलंदाजांच्या मनात धडकी भरवली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2023 4:49 PM

Open in App

ICC ODI World Cup SA vs NZ Live :  दक्षिण आफ्रिकेने हा वन डे वर्ल्ड कप गाजवला आहे. त्यांच्या फलंदाजांच्या फटकेबाजीने प्रतिस्पर्धी गोलंदाजांच्या मनात धडकी भरवली आहे. वर्ल्ड कपमध्ये नेहमी त्यांची वाट अडवणाऱ्या न्यूझीलंडलाही आज सोडलेले नाही. क्विंटन डी कॉक ( Quinton de Kock ) हा वर्ल्ड कप गाजवतोय आणि एकाच वर्ल्ड कपमध्ये ५००+ धावा करणारा तो दक्षिण आफ्रिकेचा पहिला फलंदाज ठरला आहे. 

क्विंटन डी कॉकचा रिव्हर्स स्वीप, चेंडू यंगच्या हातात; अम्पायर संभ्रमात अन् Not Out निर्णय 

न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. क्विंटन डी कॉक आणि टेम्बा बवुमा यांना किवी गोलंदाजांनी शांत ठेवले होते. ९व्या षटकात ट्रेंट बोल्टने आफ्रिकेचा कर्णधार बवुमाची ( २४) विकेट घेऊन ३८ धावांवर पहिला धक्का दिला. क्विंटन आणि रॅसी व्हॅन डेर ड्युसन यांनी चांगला खेळ सुरू ठेवला. क्विंटनने यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेत ७ इनिंग्जमध्ये ४९०* धावा केल्या आहेत. त्याने २०१५ व २०१९च्या वर्ल्ड कप स्पर्धेतील १७ इनिंग्जमध्येही ( ४५०) मिळून इतक्या धावा केल्या नव्हत्या. वर्ल्ड कपच्या एका पर्वात आफ्रिकेकडून सर्वाधिक ४८६* धावांचा विक्रम क्विंटनने नावावर केला. २००७मध्ये जॅक कॅलिसने ४८५ आणि २०१५मध्ये एबी डिव्हिलियर्सने ४८२ धावा केल्या होत्या.   

हा शेवटचा वर्ल्ड कप असल्याने क्विंटन बिनधास्त खेळताना दिसतोय आणि त्याने यंदाच्या पर्वात ५००+ धावा करणाऱ्या फलंदाजाचा पहिला मान पटकावला आहे. त्याने डेर ड्युसेनसह शतकी भागीदारी पूर्ण केली आणि या वर्ल्ड कपमधील आफ्रिकन फलंदाजांकडून ही सातवी शतकी भागीदारी ठरली. यापैकी ५मध्ये क्विंटनचा सहभाग आहे. क्विंटनने षटकार खेचून यंदाच्या पर्वातील चौथे शतक पूर्ण केले. त्याने १०३ चेंडूंत ८ चौकार ३ षटकारांसह सेन्च्युरी मारली. 

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपक्विन्टन डि कॉकद. आफ्रिकान्यूझीलंड