श्रीलंकेने विजयाचे खाते उघडले; नेदरलँड्सविरुद्ध सर्व खेळाडू एकत्रित होऊन खेळले 

ICC ODI World Cup NED vs SL Live : सलग तीन पराभवानंतर वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील आव्हान कायम राखण्याच्या निर्धाराने उतरलेल्या श्रीलंका संघाला यश आले.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2023 06:24 PM2023-10-21T18:24:39+5:302023-10-21T18:27:38+5:30

whatsapp join usJoin us
ICC ODI World Cup NED vs SL Live : Sri Lanka registered first win, beat Netherlands by 5 wickets | श्रीलंकेने विजयाचे खाते उघडले; नेदरलँड्सविरुद्ध सर्व खेळाडू एकत्रित होऊन खेळले 

श्रीलंकेने विजयाचे खाते उघडले; नेदरलँड्सविरुद्ध सर्व खेळाडू एकत्रित होऊन खेळले 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ICC ODI World Cup NED vs SL Live : सलग तीन पराभवानंतर वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील आव्हान कायम राखण्याच्या निर्धाराने उतरलेल्या श्रीलंका संघाला यश आले. नेदरलँड्सविरुद्ध त्यांनी दणदणीत विजय मिळवून गुणांचे खाते उघडले. कसून रंजिथा व दिलशान मधुशंका यांच्या उल्लेखनीय गोलंदाजीनंतर फलंदाजीत पथूम निसंका, सदीरा समरविक्रमा आणि चरिथ असलंका यांनी बहारदार खेळ केला. 


नेदरलँड्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला, परंतु श्रीलंकेच्या कसून रंजिथा व दिलशान मधुशंका यांनी प्रत्येकी ४ विकेट्स घेतल्या. २००७नंतर वर्ल्ड कप सामन्यात श्रीलंकेच्या दोन गोलंदाजांनी प्रत्येकी ४ विकेट्स घेण्याची ही पहिलीच वेळ ठरली. २००७च्या वर्ल्ड कप स्पर्धेत मुथय्या मुरलीधरन ( ४-१९) व फरवीज महरूफ ( ४-२५) यांनी आयर्लंडविरुद्ध असा पराक्रम केला होता. सिब्रँड इंग्लेब्रेच ( ७०) व लोगन व्हॅन बीक ( ५९) या जोडीने सातव्या विकेटसाठी १३० धावांची भागीदारी केली आणि जबरदस्त कमबॅक करून दिले नेदरलँड्सने ६ बाद ९१ वरून सर्वबाद २६२ धावांपर्यंत मजल मारली. मधुशंका आणि रंजिथा यांनी प्रत्येकी ४ विकेट्स घेतल्या.  

Image
वर्ल्ड कप स्पर्धेत १००च्या आत ६ विकेट्स गेल्यानंतरही सर्वाधिक धावा करणाऱ्या संघांत नेदरलँड्सने दुसरे स्थान पटकावले आहे. भारताने १९८३मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध ६ बाद ७७ वरून ८ बाद २६६ धावा केल्या होत्या. झिम्बाब्वेने १९८७मध्ये न्यूझीलंडविरुद्ध ६ बाद ९४ वरून २३९ धावांपर्यंत मजल मारली होती. नेदरलँड्सचा गोलंदाज आर्यन दत्तने श्रीलंकेला दोन धक्के दिले. कुसल परेरा ( ५) व कुसल मेंडिस ( ११) हे माघारी परतल्याने श्रीलंकेची अवस्था २ बाद ५२ अशी झाली. पथूम निसंका ५२ चेंडूंत ५४ धावांवर झेलबाद झाला.


सदीरा समरविक्रमा आणि चरिथ असलंका यांनी श्रीलंकेचा डाव सावरला होता, परंतु नेदरलँड्सकडूनही टिच्चून मारा सुरूच होता. श्रीलंकेला २० षटकांत अजूनही ९२ धावा करायच्या होत्या. सदीराने ५३ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. सदीरा आणि चरिथ यांनी ७७ धावांची भागीदारी दत्तने तोडली. ४४ धावांवर खेळणाऱ्या चरिथचा त्याने त्रिफळा उडवला. धनंजया डी सिल्वाने ( ३०) नंतर सदीराला चांगली साथ देताना ८४ चेंडूंत ७६ धावांची भागीदारी केली. श्रीलंकेने ५ विकेट्स राखून स्पर्धेतील पहिला विजय पक्का केला. सदीरा १०७ चेंडूंत ९१ धावांवर नाबाद राहिला. 

Web Title: ICC ODI World Cup NED vs SL Live : Sri Lanka registered first win, beat Netherlands by 5 wickets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.