Join us  

रोहित शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड! वर्ल्ड कपमध्ये भीमपराक्रम करणारा जगातला पहिला फलंदाज, Video

ICC ODI World Cup IND vs NZ Semi Final Live :  रोहित शर्माने घरच्या मैदानावर आक्रमक सुरूवात करून देताना त्याचा प्रथम फलंदाजीचा निर्णय सार्थ ठरवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2023 2:30 PM

Open in App

ICC ODI World Cup IND vs NZ Semi Final Live :  रोहित शर्माने घरच्या मैदानावर आक्रमक सुरूवात करून देताना त्याचा प्रथम फलंदाजीचा निर्णय सार्थ ठरवला. रोहितच्या षटकारांनी वानखेडे स्टेडियम दणाणून निघाले. वन डे वर्ल्ड कपचा हा उपांत्य फेरीचा सामना पाहण्यासाठी महान फलंदाज सचिन तेंडुलकर, महान फुटबॉलपटू डेव्हिड बेकहम, सुपरस्टार रजनीकांत आदी मान्यवर उपस्थित होते. आतापर्यंत घरच्या मैदानावर वन डे क्रिकेटमध्ये रोहितची बॅट थंडच राहिली होती, परंतु आज त्यातून चौफेर फटकेबाजी पाहायला मिळाली आणि त्याने वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला..

रोहित आणि शुबमन गिल यांनी पहिल्या ६ षटकांत ५८ धावा फलकावर चढवल्या त्यात रोहितच्या ४५ धावा होत्या. रोहितने २२ चेंडूंतील या खेळीत ४ चौकार व ४ षटकार खेचले आहेत आणि वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला. वन डे वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक षटकारांचा विक्रम त्याने नावावर केला. वर्ल्ड कपमध्ये षटकारांची हाफ सेंच्युरी साजरी करणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला. ख्रिस गेलने वन डे वर्ल्ड कपमध्ये ४९ षटकार खेचले होते. त्यानंतर ग्लेन मॅक्सवेल ( ४३), एबी डिव्हिलियर्स ( ३७) व डेव्हिड वॉर्नर ( ३७) यांचा क्रमांक येतो.  

वर्ल्ड कपच्या एका पर्वात सर्वाधिक २७ षटकारांचा विक्रमही रोहितने नावावर केला. या वर्ल्ड कपमध्ये त्याने २७ षटकार खेचून ख्रिस गेलचा २०१५ चा २६ षटकारांचा विक्रम मोडला. कर्णधार म्हणून सर्वाधिक षटकार खेचणारा फलंदाज आहे. इयॉन मॉर्गनने २०१९मध्ये २२ षटकार खेचले होते.  

भारत- रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज. 

न्यूझीलंड - केन विल्यमसन (कर्णधार), डेव्हिन कॉन्वे, रचिन रवींद्र, डेरिल मिचेल, मार्क चॅपमॅन, ग्लेन फिलिप्स, टॉम लॅथम, मिचेल सॅंटनर, टिम साउदी, लॉकी फर्ग्युसन, ट्रेन्ट बोल्ट.  

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपभारत विरुद्ध न्यूझीलंडरोहित शर्माख्रिस गेल