W,W! मोहम्मद शमीने दिले सलग दोन धक्के, बेन स्टोक्सचा प्लान करून उडवला दांडा, Video 

भारतीय गोलंदाजांसमोर त्यांनी गुडघे टेकले. जसप्रीत बुमराहने दिलेल्या सलग दोन धक्क्यांनंतर मोहम्मद शमीने कमाल केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2023 07:28 PM2023-10-29T19:28:52+5:302023-10-31T16:34:11+5:30

whatsapp join usJoin us
ICC ODI World Cup IND vs ENG Live :  MOHAMMED SHAMI MAGIC AT EKANA, He cleaned up Ben Stokes ( 0) & Jonny Bairstow ( 14), England 39/4, Video  | W,W! मोहम्मद शमीने दिले सलग दोन धक्के, बेन स्टोक्सचा प्लान करून उडवला दांडा, Video 

W,W! मोहम्मद शमीने दिले सलग दोन धक्के, बेन स्टोक्सचा प्लान करून उडवला दांडा, Video 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ICC ODI World Cup IND vs ENG Live : वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत गतविजेत्या इंग्लंडने आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आज लखनौ येथे केल्याचे दिसले. त्यांच्या गोलंदाजांनी भारतीय संघाला २२९ धावांवर रोखल्यानंतर हा सामना इंग्लंड जिंकेल असे वाटले होते. पण, भारतीय गोलंदाजांसमोर त्यांनी गुडघे टेकले. जसप्रीत बुमराहने दिलेल्या सलग दोन धक्क्यांनंतर मोहम्मद शमीने कमाल केली. त्याने बेन स्टोक्सला प्लान करून बाद केले आणि पुढच्या चेंडूवर जॉनी बेअरस्टोचाही त्रिफला उडवला.  
शुबमन गिल ( ९), विराट कोहली ( ०) आणि श्रेयस अय्यर ( ४) माघारी परतल्याने भारताची अवस्था ३ बाद ४० अशी झाली होती. रोहित शर्मा व लोकेश राहुल ( ३८) यांनी चौथ्या विकेटसाठी ९१ धावांची भागीदारी  रोहितसह सूर्यकुमार यादवने ३३ धावांची भागीदारी केली होती आणि ही जोडी तोडण्यासाठी इंग्लंडने अनुभवी गोलंदाज आदील राशीदला बोलावले आणि रोहित १०१ चेंडूंत १० चौकार व ३ षटकारांसह ८७ धावांवर झेलबाद झाला. रवींद्र जडेजा ( ८) व मोहम्मद शमी ( १) यांना झटपट माघारी पाठवून दिले. सूर्यकुमार यादव ४९ धावांवर बाद झाला आणि  जसप्रीत बुमराहने ( १६) चांगला खेळ करताना संघाला ९ बाद २२९ धावांपर्यंत पोहोचवले. डेव्हिड विलीने ३, तर ख्रिस वोक्स व आदील राशीद यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.

जॉनी बेअरस्टो व डेवीड मलान यांनी ३० धावांची सलामी दिली होती, परंतु जसप्रीत बुमराहने सलग दोन चेंडूंत दोन धक्के देऊन इंग्लंडला बॅकफूटवर फेकले. मलान ( १६) आणि जो रूट ( ०) माघारी पाठवून जसप्रीतला हॅटट्रिकची संधी होती, पण तो त्याला यश नाही आले. पण, मोहम्मद शमीने इंग्लंडचा स्टार बेन स्टोक्सचा ( १० चेंडू) भोपळ्यावर त्रिफळा उडवला. इंग्लंडला ३३ धावांवर तिसरा धक्का दिला. ९व्या षटकात बुमराहच्या गोलंदाजीवर बेअरस्टोचा स्लीपमध्ये विराटकडून झेल सुटला. पण, शमीने त्याच्या पुढच्या षटकात बेअरस्टोचा ( १४) त्रिफळा उडवला. चेंडू बॅट पॅडला लागून यंष्टिंवर आदळला.

Web Title: ICC ODI World Cup IND vs ENG Live :  MOHAMMED SHAMI MAGIC AT EKANA, He cleaned up Ben Stokes ( 0) & Jonny Bairstow ( 14), England 39/4, Video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.