Join us  

IND vs AUS Live : बूम बूम बुमराह! ऑस्ट्रेलियाला धक्का, विराट कोहलीचा भन्नाट कॅच अन् रेकॉर्ड, Video 

ICC ODI World Cup India vs Australia Live Marathi : भारतीय संघाने वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत दणक्यात सुरुवात केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2023 2:22 PM

Open in App

ICC ODI World Cup India vs Australia Live Marathi : भारतीय संघाने वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत दणक्यात सुरुवात केली. ऑस्ट्रेलियाला तिसऱ्याच षटकात धक्का देताना भारताने मोठी विकेट मिळवली. विराट कोहलीने स्लीपमध्ये भन्नाट झेल घेतला आणि एक विक्रमही नावावर नोंदवला. ( IND vs AUS Live Scoreboard

वन डे वर्ल्ड कप संघाच्या भारताच्या मोहिमेला आजपासून सुरुवात झाली. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात चेन्नईत सामना खेळला जातोय आणि ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. शुबमन गिल डेंग्यु झाल्यामुळे आजच्या सामन्याला मुकला आहे आणि इशान किशनला संधी मिळालीय. भारतीय संघ आर अश्विन, रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव या तीन फिरकीपटूंसह मैदानावर उतरला आहे. पहिली दोन षटकं सावध खेळ करणाऱ्या ऑस्ट्रेलियाला तिसऱ्या षटकात जसप्रीत बुमराहने धक्का दिला. मिचेल मार्शचा ( ०) भन्नाट झेल विराट कोहलीने पहिल्या स्लीपमध्ये घेतला.  

वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत भारताकडून सर्वाधिक १५ झेल घेणाऱ्या खेळाडूचा ( यष्टिरक्षक सोडून) विक्रम विराटने नावावर केला. त्याने अनिल कुंबळेचा १४ झेलचा विक्रम मोडला.  

भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, आर अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

ऑस्ट्रेलिया संघ - डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लाबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, अॅलेक्स केरी, कॅमेरून ग्रीन, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, अॅडम झम्पा, जोश हेझलवूड  

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाजसप्रित बुमराहविराट कोहली