Join us  

विक्रमवीर रोहित शर्मा बाद, स्टेडियमवर सन्नाटा! मॅक्सवेलची गुगली, ट्रॅव्हिस हेडचा अविश्वसनीय झेल

ICC ODI World Cup Final IND vs AUS Live : रोहित शर्माने वर्ल्ड कप फायनलमध्ये विक्रमी फटकेबाजी केली, परंतु ग्लेन मॅक्सवेलने त्याच्या खेळीला ब्रेक लावला.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2023 2:49 PM

Open in App

ICC ODI World Cup Final IND vs AUS Live : रोहित शर्माने वर्ल्ड कप फायनलमध्ये विक्रमी फटकेबाजी केली, परंतु ग्लेन मॅक्सवेलने त्याच्या खेळीला ब्रेक लावला. ग्लेन मॅक्सवेलच्या पहिल्या षटकात तुफान फटकेबाजी केली आणि मॅक्सवेलने रोहितला आमीष दाखवले. त्याला तो बळी पडला अन् ट्रॅव्हिस हेडने अविश्वसनीय झेल घेतला. भारताला पहिल्या १० षटकांत ८० धावांवर २ धक्के बसले. रोहित ४७ धावांवर झेलबाद झाला अन् नरेंद्र मोदी स्टेडियमवर सन्नाटा पसरला.

खेळपट्टी ड्राय असल्याने ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्स याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय ऐकताच प्रेक्षकांनी जल्लोष साजरा केला, कारण टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करावी अशी त्यांची इच्छा होती. ऑस्ट्रेलियाचा यशस्वी गोलंदाज जोश हेझलवूड याच्यावर हल्लोबोल करून दबाव टाकला. मिचेल स्टार्कने टाकलेल्या तिसऱ्या षटकात शुबमन गिलचा स्लीपमध्ये झेल उडालेला, परंतु तो खेळाडूच्या पुढे टप्पा पडला. चौथ्या षटकात रोहितने हेझलवूडला मारलेला खणखणीत षटकार स्टेडियम दणाणून सोडणारा होता. पण, मिचेल स्टार्कने भारताला पहिला धक्का दिला. गिल ( ४) मिड ऑफला अॅडम झम्पाच्या हाती झेल देऊन परतला.

वर्ल्ड कपच्या एका पर्वात पहिल्या १० षटकांत सर्वाधिक ३६७* धावांचा रेकॉर्ड रोहितने नावावर केला. २०१५ मध्ये न्यूझीलंडच्या ब्रेंडन मॅक्युलमने ३०८ धावा केल्या होत्या. त्याआधी २००३मध्ये अॅडम गिलख्रिस्टने २७६ धावा केल्या होत्या. रोहितने वन डेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध ८६ षटकार खेचले आणि एकाच प्रतिस्पर्धीविरुद्ध हे सर्वाधिक षटकार आहेत. ख्रिस गेलने इंग्लंडविरुद्ध ८५ षटकार खेचले होते. विराट कोहली मैदानावर होताच जोरदार जल्लोष झाला आणि त्याने     स्टार्कला सलग ३ चौकार खेचले. रोहित एकाच वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक ५८२ धावा करणारा कर्णधार ठरला. त्याने केन विलियम्सनचा ( २०१९) ५७८ धावांचा विक्रम मोडला.  

भारत - रोहित शर्मा, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज

ऑस्ट्रेलिया - ट्रॅव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लाबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, जॉश इंग्लिस, मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स, अॅडम झम्पा, जोश हेझलवूड   

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपरोहित शर्माभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाग्लेन मॅक्सवेल