'हेड'ने कोट्यवधी 'हृदयं' तोडली; भारताचं स्वप्न भंगलं, ऑस्ट्रेलियाने जग जिंकलं!

ICC ODI World Cup Final IND vs AUS Live : अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारतीय संघ २००३च्या पराभवाची परतफेड करेल अशी भारतीयांची अपेक्षा फोल ठरली.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2023 09:18 PM2023-11-19T21:18:31+5:302023-11-19T21:22:00+5:30

whatsapp join usJoin us
ICC ODI World Cup Final IND vs AUS Live : Australia won sixth ODI world cup, beat india by 6 wickets in Narendra modi Stadium at ahmedabad | 'हेड'ने कोट्यवधी 'हृदयं' तोडली; भारताचं स्वप्न भंगलं, ऑस्ट्रेलियाने जग जिंकलं!

Australia won ODI world Cup 2023

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ICC ODI World Cup Final IND vs AUS Live : अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारतीय संघ २००३च्या पराभवाची परतफेड करेल अशी भारतीयांची अपेक्षा फोल ठरली. सलग १० सामने जिंकून फायनलमध्ये पोहोचलेली रोहित शर्मा अँड टीम जेतेपदाच्या लढतीत ऑस्ट्रेलियाकडून हरली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, शाहरुख, रणवीर यांच्यासह बॉलिवूडचे स्टार्स अन् दीड लाख प्रेक्षकांच्यासमोर ऑस्ट्रेलियाने १४० कोटी भारतीयांचे स्वप्नांचा चुराडा केला. ट्रॅव्हिस हेडने ( Travis Head) मॅच विनिंग शतकी खेळी केली आणि त्याला मार्नस लाबुशेनची ( Marnus Labuschagne) दमदार साथ मिळाली. ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा वन डे वर्ल्ड कप उंचावला. १२ वर्षानंतरही भारताची वर्ल्ड कप जिंकण्याची इच्छा अपूर्ण राहिली. 

भारतासाठी 'अनलकी' अम्पायर! जसप्रीत बुमराहची तार सटकली, जे व्हायला नको तेच झालं, Video


मोहम्मद शमीने दुसऱ्या षटकात डेव्हिड वॉर्नरला ( ४) माघारी पाठवले. त्यानंतर जसप्रीत बुमराहने पुढील षटकांत मिचेल मार्श ( १५) व स्टीव्ह स्मिथ ( ४) यांना बाद केले. पण, ट्रॅव्हिस हेड व मार्नस लाबुशेन ही जोडी खेळपट्टीवर शड्डू ठोकून उभी राहिली आणि भारताच्या हातून मॅच अलगद घेऊन गेली. या दोघांच्या संयमी आणि तितक्याच जबरदस्त खेळीने भारतीय संघाचे मनोबल खचताना दिसले. पाच वेळचा विजेता ऑस्ट्रेलिया वर्ल्ड कप जिंकण्याची संधी सहजासहजी हातातून जावू देत नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. गोलंदाजांच्या दमदार कामगिरीनंतर हेड व लाबुशेन यांनी ३ बाद ४७ धावांवरून संघाला सावरले अन् विजय निश्चित केला.
ही जोडी तोडण्यासाठी शमी आणि बुमराह या प्रमुख गोलंदाजांना पुन्हा आणले गेले, परंतु त्यांच्यावरही हेडने आक्रमण चढवले. हेडच्या शतकाने स्टेडियमवर उपस्थित दीड लाख चागल्यांची बोलती बंद केली होती.

आनंदाने नाचणारा, जल्लोष करणारा भारतीय चाहता एका जागेवर स्तब्ध बसलवला. पॅट कमिन्सने विरोधातील प्रेक्षकांना गप्प करण्याची मजा असल्याचे सामन्यापूर्वी म्हटले होते आणि त्याच्या खेळाडूने ते प्रत्यक्षात करून दाखवले. दुखापतीमुळे काही सामन्यांना मुकलेल्या हेडने मोक्याच्या सामन्यात शतक ठोकले. कसोटी अजिंक्यपद फायनलमध्येही याच हेडने १६३ धावा चोपून भारताच्या हातून चषक हिस्कावला होता. लाबुशेननेही ९९ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. 

विजयासाठी २ धावा हव्या असताना हेड बाद झाला. त्याने १२० चेंडूंत १५ चौकार व ४ षटकारांसह १३७ धावा केल्या. लाबुशेनसोबत त्याची २१४ चेंडूंवरील १९२ धावांची भागीदारी संपुष्टात आली. ग्लेन मॅक्सवलेने पहिल्याच चेंडूवर दोन धावा घेताना ऑस्ट्रेलियाचा ६ विकेट्सने विजय पक्का केला. 

तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी वर्ल्ड कप फायनलचा पहिला टप्पा गाजवला. रोहित शर्माच्या ( ४७) आक्रमक सुरुवातीच्या जोरावर भारताने पहिल्या १० षटकांत २ बाद ८० धावा फलकावर चढवल्या होत्या. पण, शुबमन गिल ( ४) व श्रेयस अय्यर ( ४) हे अपयशी ठरले. विराट कोहली ( ५४) व लोकेश राहुल ( ६६) यांनी  १०९ चेंडूंत ६७ धावांची भागीदारी केली. रवींद्र जडेजा ( ९), मोहम्मद शमी ( ६), सूर्यकुमार यादव ( १८),  जसप्रीत बुमराह ( १), कुलदीप यादव ( १०) व मोहम्मद सिराज ( नाबाद ९) यांनी थोडा हातभार लावला. ११ ते ४० षटकांत भारतीय फलंदाजांना केवळ ४ चौकार मारता आले. भारताचा संपूर्ण संघ २४० धावांत तंबूत परतला.

Web Title: ICC ODI World Cup Final IND vs AUS Live : Australia won sixth ODI world cup, beat india by 6 wickets in Narendra modi Stadium at ahmedabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.