इंग्लंडने १६० धावांनी जिंकली मॅच, अजूनही आहे चमत्काराची आस; वाचा नेमकं काय घडलं

ICC ODI World Cup ENG vs NED Live : गतविजेत्या इंग्लंडने वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत दुसऱ्या विजयाची नोंद केली. नेदरलँड्सविरुद्धचा सामना त्यांनी १६० धावांनी जिंकला.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2023 09:17 PM2023-11-08T21:17:08+5:302023-11-08T21:17:27+5:30

whatsapp join usJoin us
ICC ODI World Cup ENG vs NED Live : England win by 160 runs, STILL IN CONTENTION FOR THE 2025 CHAMPIONS TROPHY | इंग्लंडने १६० धावांनी जिंकली मॅच, अजूनही आहे चमत्काराची आस; वाचा नेमकं काय घडलं

इंग्लंडने १६० धावांनी जिंकली मॅच, अजूनही आहे चमत्काराची आस; वाचा नेमकं काय घडलं

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ICC ODI World Cup ENG vs NED Live : गतविजेत्या इंग्लंडनेवन डे वर्ल्ड कप स्पर्धेत दुसऱ्या विजयाची नोंद केली. नेदरलँड्सविरुद्धचा सामना त्यांनी १६० धावांनी जिंकला. बेन स्टोक्सचे खणखणीत शतक अन् त्याला ख्रिस वोक्सची मिळालेली साथ याच्या जोरावर इंग्लंडने ३३९ धावांचा डोंगर उभारला. त्यानंतर मोईन अली व आदील राशीदसह अन्य गोलंदाजांनी १७९ धावांवर नेदरलँड्सला गुंडाळले. या विजयासह इंग्लंड ४ गुणांसह सातव्या क्रमांकावर आले आहेत आणि २०२५ मध्ये पाकिस्तानात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या शर्यतीत ते परतले आहेत. त्यासाठी त्यांना शेवटच्या साखळी सामन्यात पाकिस्तानला पराभूत करावे लागेल. शिवाय बांगलादेश, अफगाणिस्तान व नेदरलँड्स यांचा पराभव त्यांच्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. 


गतविजेत्या इंग्लंडची सुरुवातच फार चांगली झाली नाही.  जॉनी बेअरस्टो ( १५), जो रूट ( २८), हॅरी ब्रूक ( ११), कर्णधार जोस बटलर ( ५), मोईन अली ( ४) हे माघारी परतल्याने इंग्लंडची अवस्था ६ बाद १९२ अशी झाली. डेविड मलान आणि जो रूट यांनी ९३ धावांची भागीदारी करताना डावाला आकार दिला होता.  मलान ७४ चेंडूंत १० चौकार व २ षटकारांसह ८७ धावांवर रन आऊट झाला. त्यानंतर बेन स्टोक्स आणि ख्रिस वोक्स यांनी सातव्या विकेटसाठी १२९ धावांची दमदार भागीदारी केली. वोक्स ४५ चेंडूंत ५ चौकार व १ षटकारासह ५१ धावांवर माघारी परतला. स्टोक्सने ८४ चेंडूंत ६ चौकार व ६ षटकारांसह १०८ धावा केल्या. इंग्लंडने ५० षटकांत ९ बाद ३३९ धावा केल्या.

Image
नेदरलँड्सला चॅम्पियन्स ट्रॉफीच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी हा सामना जिंकणे महत्त्वाचे आहे. पण, त्यांची सुरूवात काही खास झाली नाही. मॅक्स ओ डोव ( ५) व कॉलिन एकरमन ( ०) यांना अनुक्रमे ख्रिस वोक्स व डेव्हिड विली यांनी माघारी पाठवले. वीस्ली बॅरेसी आणि सायब्रँड इंगेलब्रेच यांनी ५५ धावांची भागीदारी केली होती. बॅरेसी ३७ धावांवर रन आऊट झाला. पाठोपाठ विलीने सेट फलंदाज इंगेलब्रेच ( ३३) याला आणि राशीद खानने बॅस डे लीडला ( १०) माघारी पाठवल्याने नेदरलँड्सचा निम्मा संघ  १०४ धावा तंबूत परतला. त्यानंतर कर्णधार स्कॉट एडवर्ड ( ३८) व तेजा निदामानुरू ( ४१) वगळता अन्य फलंदाज अपयशी ठरले अन् नेदरलँड्सचा संपूर्ण संघ ३७.२ षटकांत १७९ धावांत माघारी परतला. मोईन अली व आदील राशीद यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. 

Web Title: ICC ODI World Cup ENG vs NED Live : England win by 160 runs, STILL IN CONTENTION FOR THE 2025 CHAMPIONS TROPHY

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.