Join us  

क्विंटन डी कॉक ऑन फायर! शतकासह एका फटक्यात मोडला सचिन, गांगुली अन् रोहितचा विक्रम  

ICC ODI World Cup 2023 SA vs BAN Live : क्विंटन डी कॉकने ( Quinton de Kock ) बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात शतकी खेळी करून वर्ल्ड कप स्पर्धेत मोठ्या विक्रमाची नोंद केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2023 4:41 PM

Open in App

ICC ODI World Cup 2023 SA vs BAN Live : क्विंटन डी कॉकने ( Quinton de Kock ) बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात शतकी खेळी करून वर्ल्ड कप स्पर्धेत मोठ्या विक्रमाची नोंद केली. वन डे क्रिकेटमधील हे त्याचे २०वे शतक ठरले आणि त्याने महान फलंदाज सचिन तेंडुलकर व सौरव गांगुली यांचा विक्रम मोडला. 

रिझा हेंड्रिग्कसचा दुसऱ्याच षटकात झेल सुटला. पण,  बांगलादेशच्या गोलंदाज शोरिफूल इस्लामने ७व्या षटकात त्याची भरपाई केली. हेँड्रिग्क्सला १२ धावांवर त्याने त्रिफळाचीत केले. पुढच्या षटकात मेहिदी हसन मिराझने टाकलेला चेंडू खूपच खाली राहिला आणि रॅसी व्हॅन डेर ड्युसेन ( १) त्यावर पायचीत झाला. दक्षिण आफ्रिकेला ३६ धावांवर दुसरा धक्का बसला आणि आपण नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय का घेतला, असा प्रश्न त्यांना पडला. पण, क्विंटन डी कॉक आणि एडन मार्कराम यांनी हा निर्णय योग्य ठरवला. बांगलादेशच्या फिरकीपटूंनी वळणाऱ्या खेळपट्टीवर चांगला मारा केला होता. पण, डी कॉक व मार्कराम यांनी १०७ चेंडूंत शतकी भागीदारी केली.  

३१व्या षटकात शाकिब अल हसनने १३१ धावांची ( १३७ चेंडू) भागीदारी तोडली. मार्कराम  ६९ चेंडूंत ७ चौकारांच्या मदतीने ६० धावांवर झेलबाद झाला. डी कॉकने शतक पूर्ण करताना दक्षिण आफ्रिकेकडून वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक शतकांच्या विक्रमात दुसऱ्या स्थानावर झेप घेतली. हे त्याचे वर्ल्ड कप स्पर्धेतील तिसरे शतक ठरले आणि त्याने हर्षल गिब्स, हाशिम आमला व फॅफ ड्यू प्लेसिस ( प्रत्येकी २ शतकं) यांना मागे टाकले. ४ शतकांसह एबी डिव्हिलियर्स अव्वल आहे. वर्ल्ड कपच्या एकाच पर्वात ३ शतकं झळकावणारा डी कॉक पाचवा फलंदाज ठरला. मार्क वॉ ( १९९६), सौरव गांगुली ( २००३), मॅथ्यू हेडन ( २००७), डेव्हिड वॉर्नर ( २०१९) यांनी असा पराक्रम केला आहे.  

वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वात कमी इनिंग्जमध्ये २० शतकं झळकावणाऱ्या फलंदाजांत डी कॉक ( १५०) चौथ्या क्रमांकावर आला आहे. हाशिम आमला ( १०८), विराट कोहली ( १३३), डेव्हिड वॉर्नर ( १४२) हे आघाडीवर आहेत. डी कॉकने आज एबी डिव्हिलियर्स ( १७५), रोहित शर्मा ( १८३), रॉस टेलर ( १९५) व सचिन तेंडुलकर ( १९७) यांचा विक्रम मोडला.                                 

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपक्विन्टन डि कॉकद. आफ्रिकाबांगलादेश