Join us

कसोटी अजिंक्यपद स्पर्धेला मिळू शकते मंजुरी, शुक्रवारी आयसीसी घेणार निर्णय

क्रिकेटविश्वास सध्या चर्चेचा विषय ठरत असलेल्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेला या आठवड्यात न्यूझीलंडमध्ये होत असलेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) बैठकीत मंजूरी मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 23:33 IST

Open in App

वेलिंग्टन : क्रिकेट विश्वात सध्या चर्चेचा विषय ठरत असलेल्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेला या आठवड्यात न्यूझीलंडमध्ये होत असलेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) बैठकीत मंजूरी मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

पाच दिवसीय क्रिकेटची लोप्रियता टिकवण्यासाठी व ती आणखी वाढवण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून या स्पर्धेच्या आयोजनांवर विचार होत आहे. मात्र, सध्याच्या वेगवान क्रिकेटचा काळ आणि काही देशांना या स्पर्धेमुळे होणारा नुकसानाची शक्यता या स्पर्धेची मंजुरी नेहमी पुढे ढकलली गेली. सिडनी मॉर्निंग हेराल्डने दिलेल्या वृत्तानुसार आयसीसी नऊ देशांचा सहभाग असलेल्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा विचार करत आहे. शिवाय शुक्रवारी आॅकलंड येथे होणा-या बैठकीमध्ये आयसीसी या स्पर्धेच्या आयोजनाला मंजुरी देऊ शकते. स्पर्धेला मंजुरी मिळाल्यास या स्पर्धेचे पहिले सत्र 2019 साली होईल आणि ही स्पर्धा दोन वर्ष रंगेल. तसेच, स्पर्धेचा अंतिम सामना लॉर्ड्स स्टेडियमवर खेळविण्यात येईल.

कसोटी क्रिकेटकडे प्रेक्षकांचा ओढा वाढला जावा यासाठी आयसीसीने दिवस-रात्र कसोटी सामन्यांना सुरुवात केली. अजिंक्यपद स्पर्धेसाठी ४ दिवसांचे कसोटी सामने खेळवण्याचा प्रस्तावही समोर आला होता, मात्र काही देशांनी याला आपला विरोध दर्शवला. या स्पर्धेसाठी आयसीसी आपल्या वार्षिक वेळापत्रकात बदल करणार असल्याचंही समजतंय. 5 सामन्यांच्या वन-डे मालिका संपवून यानंतर 3 वन-डे सामन्यांची मालिका खेळवण्याचा आयसीसीचा विचार आहे.

टॅग्स :क्रिकेटक्रीडा