Join us  

'गांगुली विरुद्धचं ग्रेग चॅपेलचं 'षडयंत्र' सर्वात आधी मला माहित होतं', सेहवागचा खुलासा

या वादाबाबत टीम इंडियाचा माजी खेळाडू वीरेंद्र सेहवाग याने मोठा खुलासा केला आहे. कोलकात्यातील एका कार्यक्रमात सेहवागने हा खुलासा केला. 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2018 1:36 PM

Open in App

नवी दिल्ली : टीम इंडियाचे माजी कोच ग्रेग चॅपेल आणि टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुली यांच्यातील वादावर अजूनही अधूनमधून चर्चा होत असते. आता पुन्हा एकदा या वादावर चर्चा सुरु झाली आहे. या वादाबाबत टीम इंडियाचा माजी खेळाडू वीरेंद्र सेहवाग याने मोठा खुलासा केला आहे. कोलकात्यातील एका कार्यक्रमात सेहवागने हा खुलासा केला. 

सेहवाग म्हणाला की, 'मी फिल्डींगदरम्यान ब्रेक घेतला होता. मला कमीत कमी पाच ओव्हर्सच्या ब्रेकची गरज होती. मी अंपायरला सांगितले होते की, माझं पोट बिघडलंय आणि मी त्यामुळे मैदानाच्या बाहेर जात होतो. 

तो पुढे म्हणाला की, 'ग्रेग ईमेल लिहीत होते आणि मी त्यांच्याजवळ बसलो होतो. मी पाहिलं की, ते बीसीसीआयला काहीतरी लिहीत होते. मी गेलो आणि दादाला याबाबत सांगितलं. मी त्याला सांगितलं की, ग्रेग बीसीसीआयला काहीतरी लिहीत आहे आणि हे गंभीर आहे'.

मे 2005 मध्ये टीम इंडियाचे कोच म्हणून नियुक्त केले गेलेले ग्रेग चॅपेल यांची कारकिर्द चांगलील वादग्रस्त ठरली. हा वाद त्याच झिम्बाब्वे दौ-यापासून सुरु झाला झाला होता. या दौ-यातून त्यांनी सौरव गांगुलीला बाहेर केले होते.

टॅग्स :क्रिकेटविरेंद्र सेहवाग