Join us  

तुझ्या डोक्यावर जेवढे केस नाहीत, त्यापेक्षा अधिक माझ्याकडे पैसा; शोएब अख्तरचा वीरूवर पलटवार

पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर सातत्यानं प्रसिद्धीसाठी सोशल मीडियावर भारतीय संघाच्या खेळाडूंवर टीका करत असतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2020 9:03 AM

Open in App

पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर सातत्यानं प्रसिद्धीसाठी सोशल मीडियावर भारतीय संघाच्या खेळाडूंवर टीका करत असतो. त्यानं पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करून भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागचा समाचार घेतला. 2016 मध्ये वीरूनं रावळपिंडी एक्स्प्रेस अख्तरबाबतची एक गोष्ट सर्वांना सांगितली होती. त्यावर अख्तरनं टीका करताना, तुझ्या डोक्यावर जेवढे केस नाहीत, तेवढा माझ्याकडे पैसा आहे, असा पलटवार केला.

पाकिस्तानकडे विराट पेक्षाही चांगले खेळाडू, पण...; अब्दुल रझ्झाकचे वक्तव्य

अख्तरला भारतात व्यावसाय करायचा होता आणि त्यामुळे तो भारतीय क्रिकेटचे कौतुक करतो. पण, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सक्रिय असताना  अख्तरनं कधीच भारतीय खेळाडूंचे कौतुक केले नाही. निवृत्तीनंतर केवळ भारतात व्यवसाय करायचा होता, म्हणून त्यानं भूमिका बदलली. असे भाष्य वीरूनं केलं होतं. त्यावर अख्तरनं प्रत्युत्तर दिले. तो म्हणाला,''मी वीरेंद्र सेहवागला उत्तर देऊ इच्छितो की, त्याच्या डोक्यावर जेवढे केस नाहीत त्यापेक्षा अधिक पैसा माझ्याकडे आहे. माझ्या शब्दाला एवढं महत्त्व दिले जाते, याचा मला आनंद आहे. मी जे काही बोलतो ती ब्रेकिंग न्यूज बनते.''

पाहा व्हिडीओ..सेहवागनं 2016साली म्हटलं होतं की,''शोएब अख्तरला भारतात व्यावसाय करायचा होता आणि तो आमचा चांगला मित्रही बनला होता. त्याच्या मुलाखती पाहिल्यास, तो भारताचे किती गुणगान गायचा हे दिसून येईल. पण, क्रिकेटमध्ये सक्रिय असताना त्यानं असं गुणगान गायलं नाही.''   

टॅग्स :शोएब अख्तरविरेंद्र सेहवाग