Join us  

IPL 2018 : संघाचे नेतृत्व करण्यासाठी मी सज्ज - अजिंक्य रहाणे

संघाची धुरा वाहण्यासाठी मी सज्ज झालो असून आम्ही दर्जेदार कामगिरी करू, असा विश्वास कर्णधार अजिंक्य रहाणेने व्यक्त केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2018 8:25 PM

Open in App
ठळक मुद्दे हा फक्त संघ नसून माझ्यासाठी एक कुटुंब आहे. मला संघाची धुरा वाहण्यास दिल्यामुळे मी संघाचा आभारी आहे. त्यांच्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही.

मुंबई : आयपीएलमधील राजस्थान रॉयल्स या संघाचे नेतृत्व करायला मिळणे, हे मी माझे भाग्य समजतो. संघाची धुरा वाहण्यासाठी मी सज्ज झालो असून आम्ही दर्जेदार कामगिरी करू, असा विश्वास कर्णधार अजिंक्य रहाणेने व्यक्त केला.

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान चेंडूसोबत छेडखानी केल्याची कबुली दिली. त्यानंतर स्मिथची राजस्थान रॉयल्सच्या कर्णधारपदावरून हकालपट्टी करण्यात आली आणि संघाची कमान अजिंक्यकडे सोपवण्यात आली.

या नवीन जबाबादारीबद्दल अजिंक्य म्हणाला की, " संघाची धुरा वाहण्यासाठी मी उत्सुक आहे. हा फक्त संघ नसून माझ्यासाठी एक कुटुंब आहे. मला संघाची धुरा वाहण्यास दिल्यामुळे मी संघाचा आभारी आहे. त्यांच्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही. आम्ही सर्व मिळून सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी आतूर आहोत. "

राजस्थान रॉयल्सचे क्रिकेट प्रमुख जुबिन भरुचा यांनी सांगितले की,‘स्मिथच्या मते सध्याची परिस्थिती लक्षात घेता राजस्थान रॉयल्सच्या हितासाठी कर्णधारपदाचा राजीनामा देणे योग्य आहे. त्यामुळे संघाला आयपीएलसाठी कुठल्याही अडचणीविना सज्ज होण्यास मदत मिळेल. स्मिथने बीसीसीआय व भारतीय क्रिकेट चाहत्यांचे आभार मानले आहे.’

टॅग्स :आयपीएल 2018अजिंक्य रहाणेचेंडूशी छेडछाड