Join us  

The Hundred : स्मृती मानधनाची सुसाट फटकेबाजी, 61 धावांच्या खेळीत 8 चेंडूंत चोपल्या 38 धावा, Video

The Hundred : Smriti Mandhana maiden half-century : जेमिमा रॉड्रिग्ज आणि हरमनप्रीत कौर यांच्यानंतर भारताच्या स्मृती मानधनानं 'दी हंड्रेड' क्रिकेट लीगमध्ये धडाकेबाज खेळी केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2021 10:03 PM

Open in App

The Hundred : Smriti Mandhana maiden half-century : जेमिमा रॉड्रिग्ज आणि हरमनप्रीत कौर यांच्यानंतर भारताच्या स्मृती मानधनानं 'दी हंड्रेड' क्रिकेट लीगमध्ये धडाकेबाज खेळी केली. स्मृती मानधना The Hundred League मध्ये साऊदर्न ब्रेव्ह संघाचे प्रतिनिधित्व करते अन् वेल्श फायर संघाच्या गोलंदाजांची तिनं धुलाई केली. वेल्श फायर संघानं विजयासाठी ठेवलेले 111 धावांचे लक्ष्य ब्रेव्ह संघानं 8 विकेट्स व 16 चेंडू राखून सहज पार केले. स्मृतीनं या लीगमधले पहिले अर्धशतक झळकावताना 8 चेंडूंत 38 धावा कुटल्या.

प्रथम फलंदाजीला आलेल्या वेल्श फायरकडून हॅली मॅथ्यूजनं 20 चेंडूंत 6 चौकांरांसह 33 धावा केल्या. जॉर्जिया हेन्नेसीनं नाबाद 23 धावा करून संघाला 100 चेंडूंत 7 बाद 110 धावांपर्यंत मजल मारून दिली. लॉरेन बेल व अमांडा जेड- वेलिंग्टन यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना स्मृतीनं 39 चेंडूंत नाबाद 61 धावा केल्या. तिच्या या खेळीत 5 चौकार व 3 षटकारांचा समावेश होता. 

टॅग्स :भारतीय महिला क्रिकेट संघइंग्लंड
Open in App