वर्ल्ड कप स्पर्धेच्या तोंडावर इंग्लंडला धक्का, प्रमुख फलंदाज ड्रग्स चाचणीत दोषी

आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धा तोंडावर असताना यजमान इंग्लंड संघाला मोठा धक्का बसला आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2019 01:30 PM2019-04-27T13:30:49+5:302019-04-27T13:31:07+5:30

whatsapp join usJoin us
Huge Blow for England! Alex Hales handed 21-day ban for recreational drug use | वर्ल्ड कप स्पर्धेच्या तोंडावर इंग्लंडला धक्का, प्रमुख फलंदाज ड्रग्स चाचणीत दोषी

वर्ल्ड कप स्पर्धेच्या तोंडावर इंग्लंडला धक्का, प्रमुख फलंदाज ड्रग्स चाचणीत दोषी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

लंडन : आयसीसी वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघ आणि यजमान इंग्लंड संघ यांच्याकडे जेतेपदाचे प्रबळ दावेदार म्हणून पाहिले जात आहे. या दोन्ही संघांनी मागील दोन वर्षांतील कामगिरी ही उल्लेखनीय झालेली आहे. त्यामुळे या दोन्ही संघांकडून फार अपेक्षा लावल्या जात आहेत. पण, आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धा तोंडावर असताना यजमान इंग्लंड संघाला मोठा धक्का बसला आहे. 


इंग्लंडचा प्रमुख फलंदाज अॅलेक्स हेल्स ड्रग्स चाचणीत दोषी आढळला असून त्याच्यावर 21 दिवसांच्या बंदीची कारवाई करण्यात आली आहे. इंग्लंड आणि वेल्स येथे 30 मे पासून सुरू होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेसाठी इंग्लंडने नुकताच वन डे संघ जाहीर केला आणि त्यात हेल्सचाही समावेश होता. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाच्या ड्रग्स चाचणीत हेल्स दुसऱ्यांदा दोषी आढळला आहे.


यापूर्वी हेल्स आणि बेन स्टोक्स यांच्यावर मारामारी केल्यामुळे इंग्लंड क्रिकेट बोर्डाने निलंबनाची कारवाई केली होती.  त्यामुळे आताच्या नवीन प्रकरणामुळे हेल्सवर मोठी कारवाई होऊ शकते, कदाचीत त्याला वर्ल्ड कप संघातूनही वगळले जाऊ शकते. 

दरम्यान, हेल्सला वर्ल्ड कप संघात राहण्याचा अधिकार नाही, असे मत इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनने व्यक्त केले आहे. हेल्सला कोणतीही सहानभुती दाखवू नका. असेही वॉन म्हणाला.



इंग्लंडः इयॉन मॉर्गन ( कर्णधार), जॉनी बेअरस्टो, जेसन रॉय, जो रूट, बेन स्टोक्स, जोस बटलर, मोईन अली, ख्रिस वोक्स, लिएम प्लंकेट, आदील रशीद, मार्क वूड, अ‍ॅलेक्स हेल्स. टॉम कुरन, जो डेन्ली, डेव्हिड विली

Web Title: Huge Blow for England! Alex Hales handed 21-day ban for recreational drug use

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.