Join us  

'त्या' रात्री फक्त रडत होतो- विराट कोहली

कर्णधाराने दिलेल्या संघर्षातील आठवणींना उजाळा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2020 1:16 AM

Open in App

नवी दिल्ली : कर्णधार विराट कोहलीचा सध्याचा कामगिरीचा धडाका पाहता त्याला संघाबाहेर ठेवण्याची कल्पना कुणी करणार नाही. तथापि, विराटच्या आयुष्यात एक वेळ अशी होती, ज्यावेळी संघात निवड न झाल्याने तो च़क्क रात्रभर ढसाढसा रडला होता...भारतीय क्रिकेटमधील या ‘दादा’ खेळाडूने स्वत: या गोष्टीचा खुलासा केला.‘अ‍ॅन अकादमी’तर्फे आयोजित ऑनलाईन व्हिडिओ चॅट कार्यक्रमात विराटने अनेक आठवणींना उजाळा दिला. विराटची पत्नी अनुष्का शर्मा ही देखील यावेळी सहभागी झाली होती. कुणाला अद्याप माहित नसलेल्या अनेक गोष्टींचा विराटने सविस्तर उलगडा केला.भारताला अंडर १९ क्रिकेटचे विश्वविजेतेपद मिळवून देणाऱ्या विराटच्या नावे आजच्या घडीला अनेक विक्रमांची नोंद आहे. २००८ ला पहिल्यांदा विराटला भारताकडून एकदिवसीय सामना खेळण्याची संधी मिळाली होती. कठोर मेहनतीच्या बळावर संघात स्थान निश्चित करणाºया या फलंदाजाने धावांची भूक पूर्ण करीत स्वत:चे स्थान टिकविले, शिवाय नंतर तो ‘संघ नायक’ही बनला.तो म्हणाला,‘सुरुवातीच्या काळात मी जेव्हा क्रिकेट खेळायला लागलो, तेव्हा मला दिल्ली संघात निवडण्यात आले नव्हते. त्यावेळी मी पूर्णपणे हतबल झालो होतो. कोणतीच गोष्ट मनासारखी होत नव्हती. मी त्या रात्री पूर्णवेळ फक्त रडत होतो. मी माझ्या प्रशिक्षकांनादेखील विचारले की, मला संघात का निवडले गेले नाही.?विराटने कोरोनाविरुद्धच्या लढा यासंदर्भात मत मांडले. तो म्हणाला,‘कोरोनाच्या तडाख्यात संपूर्ण देश होरपळून निघत आहे, पण त्यात एक गोष्ट सकारात्मक झाली आहे की, देशातील नागरिक एकत्र येऊन सामना करीत आहे. या लढ्यात आपण कोरोना योद्ध्यांना अर्थात पोलीस, डॉक्टर्स आणि नर्सेस यांच्याप्रति अधिक आदर व्यक्त करू लागलो आहोत.’अनुष्काशी विवाहबद्ध होताच आयुष्य बदलले‘पत्नीच्या रूपात अनुष्का आयुष्यात आली, तेव्हापासून आयुष्याला कलाटणी मिळाल्याचे कोहलीचे मत आहे. तिच्याकडून शांतचित्त राहणे आणि संयम राखणे शिकलो. याआधी मी फार उतावीळ होतो. अनुष्काच्या संपर्कात आल्यापासून संयम बाळगण्याची कला शिकलो. अनुष्का आणि मी भेटलो त्या दिवसापासूनच संयम शिकायला मिळाला, हे मी नम्रपणे सांगू इच्छितो. एकमेकांना जाणून घेतल्यानंतर दोघेही एकमेकांकडून अनेक नव्या गोष्टी शिकत आहोत. अनुष्काला शांतपणे पाहिल्यानंतर कठीण समयी शांतचित्त कसे राहायचे, हे तिच्याकडूनच शिकायला मिळाले.’- विराट कोहली, कर्णधार

टॅग्स :विराट कोहलीअनुष्का शर्मा