Join us  

...तरी विराटला तो विक्रम मोडता येणार नाही

नवी दिल्ली : विराट कोहली आपल्या शानदार फलंदाजीव्यतिरिक्त सातत्याने क्रिकेट खेळत असल्यामुळेही चर्चेत आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 3:49 AM

Open in App

नवी दिल्ली : विराट कोहली आपल्या शानदार फलंदाजीव्यतिरिक्त सातत्याने क्रिकेट खेळत असल्यामुळेही चर्चेत आहे, पण गेल्या दोन दशकातील क्रिकेटच्या व्यस्त कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर श्रीलंकेविरुद्ध सध्या सुरू असलेल्या मालिकेतील सर्व प्रकारचे (कसोटी, वन-डे व टी-२०) सामने खेळल्यानंतरही भारतीय कर्णधारला एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम मोडता येणे शक्य नाही.जर कोहलीने श्रीलंकेविरुद्ध सुरू असलेल्या मालिकेत उर्वरित दोन्ही कसोटी आणि तीन वन-डे व तीन टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले तर त्याची यंदाच्या वर्षातील सामन्यांची संख्या ५२ पर्यंत पोहोचेल तरी विश्वविक्रमापासून तो एक लढत पिछाडीवर राहील. विश्वविक्रम संयुक्तपणे राहुल द्रविड, मोहम्मद युसूफ व महेंद्रसिंह धोनी यांच्या नावावर आहे. या तिघांनी विविध कॅलेंडर वर्षांमध्ये ५३-५३ सामने खेळले आहेत.एका कॅलेंडर वर्षांत सर्वाधिक सामने खेळण्याची चर्चा केली तर आतापर्यंत २० वेळा खेळाडूंनी एका वर्षांत ५० किंवा त्यापेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याची कामगिरी केली आहे. त्यात श्रीलंकेच्या कुमार संगकाराचा समावेश आहे. त्याने तीनवेळा (२००६, २००९ व २०१२) कॅलेंडर वर्षांमध्ये आंतरराष्ट्रीय सामन्यांचे अर्धशतक पूर्ण केले आहे.कोहलीबाबत चर्चा केली तर आतापर्यंत एका वर्षात सर्वाधिक सामने खेळणाºया खेळाडूंच्या यादीच्या विक्रमामध्ये त्याच्यापुढे ६१ खेळाडूंची नावे आहेत. या सर्वांनी एका वर्षात ४५ किंवा त्यापेक्षा अधिक सामने खेळले आहेत. २०१७ मध्ये मात्र कोहलीने सर्वाधिक सामने खेळले आहेत, हे मात्र खरे आहे. त्यानंतर दुसºया स्थानी श्रीलंकेचा निरोशन डिकवेला आहे. त्याने ३८ सामने खेळले आहेत. दरम्यान, कोहलीने या कालावधीत आयपीएलचे १० सामने खेळले आहेत. त्यामुळे गेल्या काही कालावधीपासून त्याला क्रिकेटपासून विश्रांती घेता आलेली नाही.भारतीय खेळाडूंमध्ये कोहलीनंतर यंदा सर्वाधिक सामने खेळणाºया खेळाडूंच्या यादीत महेंद्रसिंह धोनी व हार्दिक पांड्या (दोघेही प्रत्येकी ३६ सामने), भुवनेश्वर कुमार (३१), शिखर धवन, जसप्रीत बुमराह व केदार जाधव (तिघेही प्रत्येकी २९ सामने) यांचा क्रमांक येतो. (वृत्तसंस्था)>२०१७मध्ये कोहलीने आतापर्यंत ४४ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्यात ८ कसोटी, २६ वन-डे व १० टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या समावेश आहे. कोहलीने यापूर्वी कधीच एका कॅलेंडर वर्षात एवढे अधिक सामने खेळलेले नाहीत. त्याने २०११ व २०१३ या दोन्ही वर्षांमध्ये प्रत्येकी ४३ सामने खेळले आहेत.>द्रविडने १९९९ मध्ये ५३ सामने खेळले होते. त्या वेळीटी-२० क्रिकेट अस्तित्वात नव्हते. या माजी भारतीय कर्णधाराने त्या वर्षी ४३ वन-डे व १० कसोटी सामने खेळले होते. पाकिस्तानच्या युसूफने त्यानंतरच्या वर्षी २००० मध्ये या विक्रमाची बरोबरी साधली तर धोनीने २००७ मध्ये ५३ सामने खेळले. त्या वेळी त्याच्या नावावर ८ कसोटी, ३७, वन-डे व ८ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांची नोंद होती.एका कॅलेंडर वर्षांत ५० किंवा त्यापेक्षा अधिक सामने खेळण्याचा पराक्रम सर्वप्रथम तेंडुलकरच्या नावावर नोंदविल्या गेला. सचिनने १९९७ मध्ये हा पराक्रम केला.सौरभ गांगुलीच्या नावावर त्या वेळी ४९ सामन्यांची नोंद होती, पण या डावखुºया फलंदाजाने दोन वर्षांनंतर १९९९ मध्ये ५१ सामने खेळून या यादीत आपले नाव नोंदवले.भारतातर्फे केवळ चार खेळाडूंनी (द्रविड, धोनी, तेंडुलकर व गांगुली) एका वर्षात ५० किंवा त्यापेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.

टॅग्स :विराट कोहलीभारतीय क्रिकेट संघ